28.5 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeIndiaआधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या अटल बोगद्याची झाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या अटल बोगद्याची झाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर २०२० रोजी अटल टनेल रोहतांगचे उद्घाटन करण्यात आले.

हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून १०,०४४ फूट उंचीवर असून, जगातील सर्वात लांब वाहतूक बोगदा म्हणून अटल बोगद्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची दाखल घेऊन त्याला सन्मानित केले आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने प्रमाणपत्र दिले आहे. हा बोगदा भारतीय आणि ऑस्ट्रियन कंपनी स्ट्रॉबेग आणि एफकॉन यांनी एकत्रित रित्या बनवला आहे. बोगद्याची लांबी ९.०२ किमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ मध्ये लाहौल-स्पितीचे मुख्यालय केलॉन्ग येथे बोगदा बांधण्याची घोषणा केली होती. त्यावेळी बोगद्यासाठी १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र,  प्रत्यक्षरीत्या तो पूर्णपणे तयार होण्यासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

अटल बोगदा तयार झाल्यानंतर मनाली ते लेह हे अंतर सुमारे ४५ किमीने कमी झाले आहे आणि त्यामुळे आता लेहला जाण्यासाठी रोहतांग खिंडीत जाण्याची गरज भासत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर २०२० रोजी अटल टनेल रोहतांगचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून देशभरातील पर्यटकांचा अटल बोगदा पहिली पसंती ठरत आहे.

आता मनालीला जाणारा प्रत्येक पर्यटक तो बघायला आवर्जून जातो. मनालीपासून अटल बोगद्यापर्यंतचे अंतर सुमारे ३० किमीपर्यंत आहे. हा जगातील पहिला बोगदा आहे, ज्यामध्ये 4G कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. बोगद्यात दर ५०० मीटरवर एक आपत्कालीन बोगदा आहे,  जो बोगद्याच्या दोन्ही टोकांनी बाहेर पडतो. त्याचप्रमाणे, प्रत्येक ३० मीटरवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहेत. दोन्ही टोकांना नियंत्रण कक्ष आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला अटल बोगदा पाहण्यासाठी मागिल १५ महिन्यांत सुमारे १७ लाख पर्यटक आले आहेत. २०२१ सालामध्ये डिसेंबर महिन्यात विक्रमी म्हणजे तब्बल तीन लाख पर्यटक मनालीला भेट द्यायला आले होते. ऑक्टोबर २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत १८.७४ लाखांहून अधिक पर्यटक मनालीला पोहोचले.

RELATED ARTICLES

Most Popular