22.7 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeTechnologyएटीएममधून जर खराब नोटा मिळाल्या तर पुढे काय !

एटीएममधून जर खराब नोटा मिळाल्या तर पुढे काय !

काही वेळेला एटीएममधून पैसे काढत असताना काही नोटा खराब कागद झालेल्या अथवा कोपऱ्यातून फाटलेल्या बाहेर पडतात. जर एटीएममधूनच अशा प्रकारच्या नोटा निघाल्या तर नक्की काय करता येते ते पाहूया थोडक्यात.

प्रथमतः खराब नोटांची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढली आहे त्या संबंधित बँकेत अर्ज करावा लागतो. त्यामध्ये एटीएमची तारीख, वेळ आणि एटीएमचे स्थान लिहावे लागते. तसेच ज्या एटीएम मधून पैसे काढले आहेत ती पैसे काढण्याची स्लिप देखील बँकेतील अर्जासोबत जोडावी लागेल. कारण संबंधित बँकेतूनच नोटांची देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे. जर तुमच्याकडे एटीएमची स्लिप उपलब्ध नसेल तर तुमच्या मोबाईलवर आलेल्या पैसे काढल्याच्या मेसेज दाखवावा किंवा प्रिंट काढून कॉपी जोडावी लागते.

तस पहायला गेलं तर, आरबीआयच्या नियमानुसार, फाटलेल्या नोटांची अशी देवघेव करत येत नाही. पण ट्विटरवरील एका वापरकर्त्याच्या तक्रारीला संबोधित करताना या परिस्थितीमध्ये ग्राहकांनी काळजी न करता, काय पावले उचलावीत हे बँकेने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत देखील असे सांगण्यात आले आहे की, आमच्या एटीएममध्ये नोटा लोड करण्यापूर्वी, नोटा या अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे तपासणी प्रक्रियेमधून जातात. त्यामुळे खराब किंवा फाटलेल्या नोटांचे वितरण होणे हि अशक्यप्राय गोष्ट आहे. पण तरीही एखाद्या वेळी असे झाले तर आमच्या कोणत्याही शाखेतून तुम्ही नोटांची अदला बदली करून घेऊ शकता.

एसबीआयच्या मते, एखादी व्यक्ती सामान्य बँकिंग अथवा रोख संबंधित श्रेणी अंतर्गत

https://crcf.sbi.co.in/ccf/

या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवू शकते. ही लिंक केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमकरिता आहे. एटीएममधून आलेल्या खराब नोटा बदलण्यास कोणतीही बँक काहीही कारणास्तव इन्कार करू शकत नाही. तरीही असे असूनसुद्धा बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. तक्रारीच्या आधारावर बँकेला १०,००० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई म्हणून ग्राहकाला द्यावी लागू शकते.

RELATED ARTICLES

Most Popular