27.8 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

सारखाप्यात विजेच्या धक्क्याने वृद्धा ठार, नातू जखमी

साखरपा- जाधववाडी येथील वृद्धेला खांबावरून तुटून लोंबकळणाऱ्या...

चिपळूणमध्ये नव्या इमारतीसाठी आराखडा, तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया

चिपळूण पालिकेची इमारत ब्रिटिशकालीन आहे. पालिकेच्या दोन्ही...

आरे-वारे किनारी वाहने नेणाऱ्यांना रोका…

काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या पाण्यापर्यंत चारचाकी वाहने...
HomeMaharashtraअभिनेता सैफ अली खान यांच्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला!!

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला!!

सैफ अली खानवर ६ वार करण्यात आले होते.

प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खान यांना पहाटे ३ वाजण्याच्या सुम ारास लिलावती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. सैफ अली खानंवर ६ वार करण्यात आले होते. यापैकी ३ वार हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे होते. मानेवर जवळपास १० सेमी. लांब अशी जखम होती. पाठीतही गंभीर वार झाले होते. मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती गंभीर होती. मात्र लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. लिलावती रुग्णालयात न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरी अशा २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सैफच्या हा संशयित चोरटा सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीमध्ये घुसला. हल्लेखोराने फायर एस्केपचा यूज करून १२ मलजी पायऱ्यांवरून घरी प्रवेश केला आणि हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून आरोपीला रात्रीपर्यंत बेड्या ठोकण्यात आम्हांला यश मिळेल असा दावा मुंबई पोलीसांनी गुरूवारी सायंकाळी पत्रकारांना तपासाबाबत माहिती देताना केला आहे.

सारा देश हादरला – साऱ्या मंनोरंजन विश्वाला अम्मण महाराष्ट्रासह साऱ्या देशाला हादरवणारा हा हल्ला नेमका कोणी केला याचा शोध पोलीस घेत असून सकृतदर्शनी घरात घुसलेल्या चोराने तो केला असावा असा कयास वर्तविण्यात येत आहे.

मध्यरात्रीचा थरार – बॉलिवूडचे अभिनेते सैफ अली खान, त्यांची पत्नी करीना कपूर आणि मुलांसह वांद्रेतील सतगुरू शरण या इम ारतीच्या १२ व्या मजल्यावर राहतात. संपूर्ण फ्लोअर त्यांचा आहे. सुमारे ५५ कोटी रूपयांचे हे आलिशान असे मकान आहे. याच घरात बुधवारी रात्री ते झोपी गेले होते. मुलांच्या रूममध्ये त्यांना सांभाळण्यासाठी ठेवण्यात आलेल्या नर्ससह मुलं होती तर शेजारच्या बेडरूममध्ये सैफ अली खान हे झोपले होते.

रात्री दीडच्या सुमारास – गाढ झोपेत असताना अचानके प्रचंड ओरडा ऐकून सैफ अली खान आणि त्यांची पत्नी करीना कपूर यांना जाग आली. ते जागे झाले तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. मुलांच्या रूममध्ये त्यांची काळजी घेण्यासाठी नेमलेली नर्स आरडाओरडा करत होतीं त्यामुळे जाग आली. ते जागे झाले तेव्हा रात्रीचा बीड वाजला होता. मुलांच्या रूममध्ये न्यांची काळजी घेण्यासाठी नेमलेली नर्स आरडाओरडा करत होतीं त्यामुळे सैफ अली खान बाहेर आले.

पाहतात तो – ती का किंचाळत आहे हे पाहण्यासाठी सैफ अली खान मुलांच्या रूममध्ये शिरले तेव्हा त्यांना त्या रूमम ध्ये एक व्यक्ती घुसल्याचे लक्षात आले. त्या व्यक्तीने त्या नर्सलाही मारहाण केली होती आणि तो मुलांना काहीतरी करेल या भितीने तिने आरडाओरडा सुरू केला होता. मुलांना काही होऊ नये म्हणून सैफ अली खान यांनी या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला.

चाकूने सपासप वार – त्यावेळी त्या व्यक्तीने हातातील धारधार चाकूने सैफ अली यांच्यावर हल्ला चढवला. एरव्ही चित्रपटात दे दणादण हाणामारी करणाऱ्या सैफ अली यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. ते हाताने त्या व्यक्तीला दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच धारधार चाकूने त्या व्यक्तीने त्यांच्यावर वार केले. एक-दोन नव्हे तर तब्बल ६ वार करण्यात आले. मानेवर, पाठीच्या मणक्यावर, हातावर, पोटावर हे वार या व्यक्तीने केले.

रक्ताच्या थारोळ्यात – ६ वार केल्यानंतर घुसलेली व्यक्ती खिडकीतून उडी मारून पसार झाली. तर सैफ अली खान रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ते पाहून चोरट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नर्सने आणि मुलांनी करीना कपूरना खोलीत आणले. त्यांनी धावपळ करून त्यांना रूग्णालयात नेण्याचे प्रयत्न केले.

रिक्षाने नेले – पार्किंगमधून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न चालक करत होता. मात्र त्याला वेळ लागणार हे कळताच एका रिक्षातून त्यांना त्यांचे सुपुत्र इब्राहिम आणि पत्नी करीना, कन्या सारा यांनी लिलावती रूग्णालयात आणले. त्यावेळी खूप रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तातडीने दाखल करून घेत ऑपरेशन रूममध्ये शिफ्ट केले. तातडीने उपचार सुरू करण्यात आले त्यामुळे सैफ अली खाने बालंबाल या प्राणघातक हल्ल्यातून बचावले आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सारा देश हादरला – सैफ अली खान यांच्यावर खुनी हल्ला झाल्याच्या वृत्ताने गुरूवारी सकाळी अवघा देश हादरला. पोलीसांना खबर देण्यात आली. पहाटे ५ वाजल्यापासून पोलीस सैफ अली खानच्या घरामध्ये पोहोचले होते. कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यातं आली असताना ती व्यक्ती घरात घुसलीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपासाला वेग दिला आहे.

शेजारच्या इमारतीतून आला – पोलीसांनी केलेल्या तपासात संशयित आरोपी हा सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीच्या शेजारच्या इमारतीतून उडी मारून खिडकीतून बेडरूममध्ये शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. सैफ अली खान ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीला २ लिफ्ट आहेत. या दोन्ही लिफ्टचा वापर घुसलेल्या माणसाने केलेला नाही. तो शेजारच्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून सैफ अली खान यांच्या इमारतीत आला असे दिसते आहे. मात्र तो बेडरूममध्ये नेमका कसा शिरला याचे फुटेज मिळालेले नाही. हल्ला केल्यानंतर तो खिडकीतून उडी टाकून पळाला असे जखमी नर्सने सांगितले. त्यामुळे तो येतानाही खिडकीतूनच आला असावा असा प्राथमिक कयास पोलीसांनी वर्तविला आहे. हल्लेखारोच्या शोधासाठी एकूण १० पथके स्थापन करण्यात आली आहेत. कसून तपास सुरू आहे. आम्ही आरोपीपर्यंत लवकरच पोहोचू असा विश्वास पोलीसांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून परिचित असलेले दया नायक यांच्या नेतृत्वाखाली तपास वेगाने सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular