रत्नागिरी मध्ये दोन वर्षापूर्वी घडलेल्या गुन्हे प्रवृत्तीच्या घटनेतील आरोपीला अखेर न्यायलयाने शिक्षा ठोठावली आहे. शुल्लक कारणावरून डोक्यात राग घालून घेऊन तरुणाच्या पोटात चॉपरने वार करून जखमी करणार्या आरोपीला न्यायालयाने ७ वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना २८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास जांभरुण बौध्दवाडी येथे घडली होती. अरविंद अनंत सावंत असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या अरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात सुबोध गंगाराम सावंत याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस तपास सुरु झाला असून, अखेर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे कि, २८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी सुबोध कामावरुन घरी जात होता. त्यावेळी जांभरुण बौध्दवाडी येथे अरविंदची मोटार सायकल बंद पडल्याने तो त्याचे मित्र ॠतिक दिपक सावंत आणि यश संतोष सावंत यांच्यासोबत तिथे उभा होता. तेव्हा सुबोधने तिथून जाताना त्यांना काय करताय? असे विचारले. पण आरोपीने त्याला गाडी बंद पडली म्हणून चिडवतो आहे असा समाज करून घेऊन याचा राग येऊन अरविंदने सुबोधला धक्काबुक्की करुन खिशातील चॉपर काढून सुबोध वर उगारला. सुबोधने तो वार चुकवला, परंतु, सुबोधच्या अंगठ्याला या झटापटीमध्ये दुखापत झाली. त्यानंतर अरविंदने सुबोधच्या पोटात चॉपर मारुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या सुबोधला गावातील स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केले.

