25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeChiplunचिपळुणात अलोरे येथे भरदिवसा चौघांचा महिलेच्या घरावर हल्ला

चिपळुणात अलोरे येथे भरदिवसा चौघांचा महिलेच्या घरावर हल्ला

पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये चारही जण अनोळखी होते.

चिपळूण तालुक्यातील आलोरे देवरेवाडी येथे घरात एकट्या असलेल्या एका महिलेच्या घरावर चार जण चाल आले आणि दरवाजा उघडला नाहीस तर तुला ठार मारू असं अशी धमकी देत खिडकीत मधूनचं त्या महिलेवर सुरा फेकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना चिपळूण तालुक्यातील अलोरे देवडेवाडी येथे २० सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये चारही जण अनोळखी असल्याचं तिने म्हटले आहे. हे चारही जण २० ते २५ वयोगटातले असून अंगाने सावळे आणि त्यांच्या सगळ्यांच्या अंगात काळा शर्ट होता. तर त्यांच्या तोंडाला मास्क होता त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती.

ही महिला घरी असताना ही चार अज्ञात अनोळखी माणसं घराबाहेर आली आणि त्यांनी महिलेच्या घराचा दरवाजा जोर जोरात ठोठावायला सुरुवात केली. दरवाजा उघडला नाहीस तर तुला ठार मारू अशी धमकी देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यातीलच एकानं महिलेच्या घराच्या खिडकी खाली असलेल्या गवत कापण्याचा सुरा उचलला आणि खिडकीतुनच तो त्या महिलेच्या अंगावर फेकून मारला. मात्र हा. सुरा हल्ला महिलेने चुकवला. यादरम्यानच मोठ्या धाडसाने चाकू फेकून मारणाऱ्या त्या व्यक्तीचा हात खिडकीच्या आत आल्याने महिलेने तो हात पकडला.

यात मोठी झटापट झाली आणि त्या हल्लेखोरांच्या हाताला मोठ्या प्रमाणात खरंचटंल. दरम्यान हे सगळं घडत. असतानाच चौघांपैकी दोघाजणांनी महिलेच्या घराच्या पाठीमागच्या दरवाजाला जाऊन त्याचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. जोरजोरात दरवाजा वाजवत, दार उघड, नाहीतर तुला ठार मारू अशी धमकी दिली. बराचवेळहा प्रकार सुरू होता. त्यानंतर चौघेही पळून गेले. मात्र एका महिलेच्या घरावर भर दिवसा असा हल्ला करून तिला ठार म ारण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून रत्नागिरी जिल्ह्यात खरंच महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

याप्रकरणी अलोरे पोलीस स्थानकामध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १२४, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे चार अज्ञातविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यातून पोलीस या चौघांना पकडणार कसे, हे चौघही स्थानिक होते का, की परजिल्ह्यातून किंवा राज्यातून रत्नागिरीमध्ये आले होते आणि या महिलेवर हल्ला करण्यामागचा त्यांचा हेतू कोणता होता असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असून आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular