24.4 C
Ratnagiri
Sunday, August 17, 2025

पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर – पालकमंत्री डॉ. सामंत

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य...

मोदींचे दिवाळी गिफ्ट! मध्यमवर्गीयांना मिळणार मोठा दिलासा

सणासुदीचे दिवस सुरू झाले असताना देशाचे पंतप्रधान...

रत्नागिरीतील एका बँकेत? नोटीस येताच खळबळ

रत्नागिरी जिल्ह्यातील एका बड्या बँकेच्या ९३ कर्जदार...
HomeRatnagiriकोळकेवाडी धरणावर आकर्षक रोषणाई...

कोळकेवाडी धरणावर आकर्षक रोषणाई…

लेसर शोच्या निमित्ताने धरणाचे ३ वक्र दरवाजे एकाचवेळी उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोळकेवाडी धरणावर गुरुवारी (ता. १४) सायंकाळी देशप्रेमाचा अद्वितीय सोहळा रंगला. धरणाच्या पाण्यावर लेसर शोच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करण्यात आली. तिरंगी प्रकाशात परिसर झळाळून निघाला होता. त्यात देशभक्तीची गाणी सुरू असल्याने उपस्थितांचे हृदय अभिमानाने भरून आले. देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. अभियानात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. १३) ते शुक्रवार (ता. १५) या काळात राष्ट्रध्वजासोबत सेल्फी अपलोड करता येणार आहे. यंदा ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता, स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या घोषवाक्यासह अभियान साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोळकेवाडी धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी सातनंतर लेसर शोच्या निमित्ताने धरणाचे ३ वक्र दरवाजे एकाचवेळी उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला.

पाणी सोडण्यापूर्वी कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाने नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.  कोळकेवाडी धरणाच्या दरवाजांतून कोसळणारे पाणी, त्यावर पडणारे हिरवे, केशरी, पांढरे किरण आणि पाण्याच्या तुषारांत नाचणारे प्रकाशचित्र ही नजर खिळवून ठेवणारी जादू अनुभवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी धरण परिसर गजबजून गेला, शोदरम्यान भारताचा तिरंगा, स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथा आणि सैनिकांच्या पराक्रमाचे चित्रण आकाशात व पाण्याच्या पडद्यावर झळकले. ‘वंदे मातरम्’, ‘जन-गण-मनच्या स्वरांतून संपूर्ण परिसर भारावून गेला, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओं टिपून ते कायमस्वरूपी जतन केले. या सोहळ्यामुळे कोळकेवाडी धरण परिसरात पर्यटनाची आणखी एक आकर्षक ओळख निर्माण झाली असून, पावसाळ्यातील पाण्याच्या साठ्याबरोबरच स्वातंत्र्याचा उत्सव लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला.

चिपळूणच्या पूर नियंत्रणाला मदत – कोयना धरणातील पाण्यावर टप्पा एक, दोन आणि चारमध्ये वीज निर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते. कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी तिसरा टप्पा आहे. धरणातील पाण्याची क्षमता एक टीएमसी आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातून येणारे पावसाचे पाणीसुद्धा याच धरणात साठवले जाते. त्यामुळे चिपळूणच्या पूर नियंत्रणाला मोठी मदत मिळते.

RELATED ARTICLES

Most Popular