25.7 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtraआमदार संजय सिरसाट यांची प्रकृती स्थिर, परंतु डॉक्टरांच्या निगराणीखाली

आमदार संजय सिरसाट यांची प्रकृती स्थिर, परंतु डॉक्टरांच्या निगराणीखाली

मुंबई विमानतळावर एअर ऍब्युलन्सनने दाखल झाल्यानंतर विमानतळावरील रुग्णवाहिकेतून त्यांना बाहेर आणण्यात आलं

औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी शिरसाट हे मुंबईत दाखल झाले आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानंतर संजय शिरसाट यांना विशेष एअर एम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं. औरंगाबादमध्ये सोमवारी शिरसाट यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र औरंगाबादमधील रुग्णालयातून शिरसाट यांना आता थेट मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मंगळवारी सकाळी तातडीने त्यांनी त्यासाठी मुंबईत आणल्यावर उपचार सुरु करण्यात आले.

मुंबई विमानतळावर एअर ऍब्युलन्सनने दाखल झाल्यानंतर विमानतळावरील रुग्णवाहिकेतून त्यांना बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर एका खासगी कार्डियाक रुग्णावाहिकेत त्यांना शिफ्ट करण्यात आलं. या कार्डियाक रुग्णवाहिकेतून त्यांना आता वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुंबई विमानतळावरील रुग्णवाहिकेतून कार्डियाक एब्युलन्समध्ये संजय शिरसाट हे स्वतः चालत गेले. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या हाताला धरुन चालत जात शिरसाट हे स्वतः कार्डियाक रुग्णावाहिकेमध्ये चढताना दिसले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता. तसंच काहीसा अशक्तपणाही संजय शिरसाट यांना आल्याचं समोर आलेल्या दृश्यांमध्ये दिसलं.

आमदार संजय शिरसाट यांच्यावर लिलावती रुग्णालयातच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान संजय शिरसाठ यांच्या हृदयात ब्लॉकेज आढळला होता. या ब्लॉकेजमुळे रक्तवाहिन्या बंद पडण्याचा धोका वाढला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्यावर यशस्वी एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे. शिरसाट यांच्यावर शस्त्रक्रिया करून एक स्टेन टाकण्यात आल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. सध्या संजय सिरसाट यांची प्रकृती स्थिर असून त्यांना २४ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular