20.2 C
Ratnagiri
Saturday, November 15, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeIndiaलसीकरणासाठी सरकार घेणार सलमानची मदत

लसीकरणासाठी सरकार घेणार सलमानची मदत

संपूर्ण महाराष्ट्र लसीकरणाच्या मोहिमेत देशात अग्रेसर आहे. अजून कोरोना संपुष्टात आलेला नसून, त्याचा संसर्ग प्रमाण कमी आले आहे. त्यामुळे लहान खेड्यापासून ते मोठ्या शहरांपर्यंत लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी एक डोसची मात्रा झाल्यावर दुसर्या डोसकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे लसीकरणाबाबत जागरुकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानची मदत घेण्याचा विचार करत आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोनारानेच कान टोचावे या उक्तीप्रमाणे, एखाद्या आवडत्या आणि प्रसिद्ध व्यक्तीने कोणत्या गोष्टीसाठी आवाहन केले तर, जनतेपर्यंत त्या गोष्टी लगेच पोहोचतात. आणि जनता मग त्या आवडत्या व्यक्तीसाठी या गोष्टी करायला तयार सुद्धा होतात.

शहरी भागामध्ये १०० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. देशात असा रेकॉर्ड बनवण्यात मुंबई एक नंबरला आहे. मुंबईत ६५ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. परंतु औरंगाबादसारख्या काही जिल्ह्यात लसीकरणाचा वेग इतक्या धीम्या गतीचा आहे.

त्या विभागामध्ये लसीकरणाचा वेग कमी असलेल्यांमध्ये जास्त करून लोकसंख्या मुस्लीम समाजातील आहे. लोकांच्या मनात लसीकरणाबाबत निर्माण झालेले जे काही गैरसमज आहेत ते पूर्णत: निराधार आहेत. त्यामध्ये सोयीनुसार अनेक अंधश्रद्धा लोक बाळगून आहेत. त्यामध्ये एका धार्मिक व्यक्तीला लसीची आवश्यकता भासत नाही किंवा लस त्यांच्यासाठी हिताची नाही. हा अंधविश्वास आणि अज्ञान असून जीवाच्या सुरक्षिततेसाठी ते दूर होणं गरजेचे आहे. त्यासाठीच जनतेला लसीकरणाबाबत जागृत करायला हवं. म्हणून सलमान खान सारख्या सुपरस्टारची मदत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES

Most Popular