23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeRatnagiriबनवाबनवी टोळी गजाआड

बनवाबनवी टोळी गजाआड

रत्नागिरीमधील एक रिक्षा व्यावसायिक फैयाज दिलावर शेख वय ४० रा. शिरगाव हे रत्नागिरीमध्ये गेली ११ वर्षे रिक्षा व्यवसाय करतात. त्यांच्या स्वत:च्या मालकीची MH08E-6576 या क्रमांकाची रिक्षा आहे. हि रिक्षा रत्नागिरी आरटीओ ऑफिसला पासिंगसाठी नेली असता ती ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याचे त्यांना समजले. अधिक माहिती घेतली असता कोल्हापूर आरटीओकडून हि कारवाई करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. परंतु, शेख यांनी सांगितले कि, जी रिक्षा कधी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर गेलेलीच नाही, तिच्यावर कोल्हापुरमध्ये कारवाई होऊच कशी शकते? या सर्व प्रकरणामध्ये काहीतरी काळबेर असल्याचे त्यांच्या लक्षात आले, ते या प्रकारणाच्या शोध घेण्यासाठी कोल्हापूरला गेले. परंतु, तिथे सुद्धा त्यांना काहीच समाधानकारक माहिती मिळाली नाही.

म्हणून त्यांनी आपल्या मित्राला या सर्व प्रकरणाची माहिती दिली आणि मदत करण्यास सांगितली. कोल्हापुरात या रिक्षेचा नंबर वापरून दुसराच कोणतरी रिक्षा व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याचा उलगडा करण्यासाठी सुद्धा शेख यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पोलिसांना एकाच नंबरच्या दोन रिक्षा आहेत हा पुरावा देण्यासाठी शेख यांचे मित्र मुजावर यांनी हि रिक्षा रत्नागिरीतील नो पार्किंगमध्ये उभी करून ठेवली, त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. या रिक्षेचा फोटो पोलिसांनी ऑनलाईन अपलोड करून कारवाई करण्यात आली आणि ६ जून २०२१ रोजी शेख यांच्या मोबाईलवर रिक्षावर कोल्हापूर येथे कारवाई झाल्याचा मेसेज आला.

त्यामुळे पोलिसांना दाखवायला पुराव्या दाखल हे दोन्ही फोटो कोल्हापूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर चोगले यांना पाठवण्यात आले. यानंतर हि बनवाबनवी उघड करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची तपास चक्रे वेगाने फिरली, त्यामध्ये कोल्हापुरमधील एक टोळी रत्नागिरीतील या रिक्षाचा नंबर वापरून व्यवसाय करत असल्याचे समोर आल्यावर त्या टोळीला अटक करण्यात आले. पण शेख यांना या गोष्टींचा नाहक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला.

RELATED ARTICLES

Most Popular