25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriजिल्ह्यात सरासरी ६४ टक्के मतदान, प्रक्रिया शांततापूर्ण

जिल्ह्यात सरासरी ६४ टक्के मतदान, प्रक्रिया शांततापूर्ण

सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीत ६०.३५ टक्के मतदान झाले.

सकाळच्या सत्रापासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतर उन्हामुळे मतदारांनी विश्रांती घेतली आणि पुन्हा सायंकाळी मतदारांनी गर्दी केली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीच्या कामाला प्राधान्य दिले. ती कामे आटोपून सायंकाळी मतदानासाठी शेतकरी वर्ग बाहेर पडला. यंदा मोठ्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात मतदानासाठी दाखल झाले. सर्वच उमेदवारांनी चाकरमान्यांना गावाकडे आणण्यासाठी भर दिलेला होता. सकाळच्या सत्रात ९ टक्केच मतदान झाले होते. त्यानंतर चार तासांत म्हणजेच दुपारी १ वाजेपर्यंत २९ टक्क्यांची भर पडली. सायंकाळच्या संत्रात मतदारांनी सर्वाधिक मतदान केले, त्यामुळे सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीत ६०.३५ टक्के मतदान झाले. महायुतीचे विद्यमान मंत्री उदय सामंत आणि परिवर्तनाचा नारा देणारे महाविकास आघाडीचे बाळ माने यांच्यातच प्रमुख लढत होती आणि या दोनच उमेदवारांचे बूथ शहरात पाहायला मिळाले. शहरात सकाळी साडेसह्य वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ सुरू झाली.

सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वगनि सर्वप्रथम मतदान केले. सकाळीच मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गाडीतळ येथील पालिका शाळेच्या मतदान केंद्रात पन्नास ते शंभर मतदार दोन रांगांमध्ये उपस्थित होते. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी बहुतांशी केंद्रांवर मंडप व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले. दुपारी १२ ते १ वाजल्यानंतर मतदान केंद्रावरील गर्दी थोडी कमी झाली. पहिल्या चार ते पाच तासांत सुमारे ४० टक्के मतदान झाले. प्रत्येक केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. सायंकाळी मतदारांची केंद्रांवर गर्दी वाढत गेली.

गृहमतदानाबाबत जागृतीची गरज – गृहमतदानाची सुविधा प्रशासनाने दिली होती; परंतु ग्रामीण भागातील मतदारांना या व्यवस्थेची कल्पनाच नव्हती. त्यामुळे आज ८० ते १०० वयोगटातील अनेक ज्येष्ठांनी स्वतः मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. बूथवर बसणाऱ्या कार्यकर्त्यांना चहा, नाश्ता, पाणी, दुपारचे जेवण अशी सुविधा महायुती, महाविकास आघाडीतर्फे केली होती. या ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन, मदतीचे काम करण्यात येत होते. काहींना मतदार यादीत नाव शोधण्यापासून नंबर सांगण्याची व्यवस्था केली होती. काही मोठ्या केंद्रांवर लॅपटॉप घेऊनही हे काम करण्यात येत होते.

अधिकाऱ्यांचे मतदान – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्नी अंकिता यांनी मतदान केले. रत्नागिरी मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी पत्नी सौम्यश्री यांच्यासह येथील दामले विद्यालयात मतदान केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी रा. भा. शिर्के प्रशालेत मतदान केले. पालिका शाळा क्र. ५, स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय केंद्रावर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मतदान केले.

मोबाईलला बंदी – मतदान करताना मतदाराने मोबाईल नेऊ नये, अशा सूचना असल्याने सर्वच मोबाईल बाहेर जमा करण्यात येत होते. अनेकांनी मोबाईल आणले नव्हते; परंतु काही ज्येष्ठांना मोबाईल कुठे ठेवावा, याची समस्या भेडसावत होती. त्यांनी नाराजीही व्यक्त केली. मतदान केंद्रात मतदान करताना फोटो, व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नव्हती. तरीही नेत्यांचे फोटो काढल्याने याला कशी काय परवानगी दिली, असा सवाल काही मतदारांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular