21.6 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeIndia“या” वक्तव्यावर बाबा रामदेव यांनी देशवासीयांची माफी मागावी

“या” वक्तव्यावर बाबा रामदेव यांनी देशवासीयांची माफी मागावी

माझे म्हणणे असे कि, महिलांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात.' असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे

ठाण्यातील योग शिबिरात बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. हे प्रकरण असे की, ‘महिला सलवार सूटमध्येही छान दिसतात. माझे म्हणणे असे कि, महिलांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात.’ असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. ठाण्यात पतंजली योग समिती,  भारत स्वाभिमान तर्फे मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ते शिवसेनेचे खासदार संजय राऊतपर्यंत रामदेव बाबा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यातच आता टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनीही त्यांच्या महिलां विरोधातील वक्तव्यावर टीका केली आहे.

रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महुआ म्हणाल्या, आता मला समजले की बाबा त्यावेळी महिलांच्या कपड्यात रामलीला मैदानातून का पळून गेले. ते नेहमी म्हणतात की त्यांना ‘साडी, सलवार आणि…. आवडत. तसेच त्याच्या मेंदूमध्ये स्ट्रॅबिस्मस आहे, ज्यामुळे त्याचे विचार एकतर्फी बनतात.”

दरम्यान, यापूर्वी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. आपल्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर करताना त्यांनी, स्वामी रामदेव यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांसमोर केलेली टिप्पणी अशोभनीय आणि निषेधार्ह आहे.  या वक्तव्यामुळे तमाम महिला दुखावल्या आहेत, या वक्तव्यावर बाबा रामदेव यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

तसेच उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी, अमृता फडणवीस यांनी या वक्तव्याला विरोध का केला नाही? असा सवाल उपस्थित केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज्यपाल शिवाजीबद्दल अपमानास्पद वक्तव्य करतात, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावे आपल्या राज्यात विलीन करण्याची धमकी देतात, आता भाजपचे प्रचारक रामदेव महिलांचा अपमान करतात, आणि तरीही सरकार गप्प आहे. सरकारने आपला शब्द दिल्लीकडे गहाण ठेवला आहे का? असा परखड प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

RELATED ARTICLES

Most Popular