25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeRatnagiriरत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

मच्छीमार्केटमधील दुर्गंधी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले असून त्याच्या बाजूलाच विक्रेते मच्छी विक्री करतात. खवय्यांना नाक मुरडत या ठिकाणी जावे लागत आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो तसेच आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे याकडे मत्स्य विभागाने गांभीयनि लक्ष द्यावे, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. रत्नागिरीतील सर्वांत मोठे बंदर म्हणून मिरकरवाड्याची ओळख आहे. या ठिकाणी दरदिवशी मासळीविक्रीतून कोटीची उलाढाल होते.

सध्या पाऊस असल्यामुळे मासेमारी बंद आहे. मिरकरवाडा प्राधिकरणाला मच्छीमारांनी कर भरणे आवश्यक आहे; परंतु मच्छीमार कर भरत नसल्याने मच्छीमारांना मिळणाऱ्या भौतिक सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे पावसाचा जोर वाढत आहे. रस्त्यांची दुरवस्था, उघडी गटारे आणि शहरातील मच्छीमार्केटमधील दुर्गंधी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन पावसाळ्यात उघडी गटारे, साचलेल्या पाणी आणि जेटीवरील दुर्गंधीयुक्त पाणी यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही खवय्ये मिरकरवाडा जेटी येथे मासे खरेदीला जातात; परंतु त्यांना आता दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. त्या अवस्थेत मासे खरेदी करावी लागते. १ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज मच्छीमार्केट उभारण्यात आले आहे; परंतु त्याची स्वच्छता ठेवली नाही तर मार्केटमध्ये खरेदीसाठी कोण येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने या मार्केटच्या स्वच्छतेसाठी प्रयत्नांची गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular