26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSportsनवजात मुलीचे अंत्यसंस्कार करून आलेल्या खेळाडूचे मैदानात शतक, सर्वानी ठोकला सलाम

नवजात मुलीचे अंत्यसंस्कार करून आलेल्या खेळाडूचे मैदानात शतक, सर्वानी ठोकला सलाम

चंदीगडविरुद्ध विष्णूने १२ चौकार लगावून १०४ धावाचे लक्ष्य साध्य केले. बडोदा क्रिकेट असोसिएशनने त्याचा उल्लेख “वास्तविक हिरो” असा केला आहे.

सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा विष्णू सोळंकीने चंडीगड विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये शतक झळकावून सर्वांची वाहवा मिळवली आहे. परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेल्या घटनेमुळे तो पूर्णतः हादरून गेला आहे. त्याही परिस्थितीवर मात करून, धैर्य एकवटून तो सामन्यामध्ये खेळला. नुसता खेळलाच नाही तर उत्कृष्ट कामगिरी सुद्धा केली.

रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून चंदीगडविरुद्ध खेळणाऱ्या विष्णू सोळंकीने शतक झळकावले. शतक झळकावल्यानंतर सर्वजण विष्णूला सलाम करत आहेत. सामन्याच्या काही तासांपूर्वीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे या खेळाडूच्या नवजात मुलीने जगाचा निरोप घेतला होता. मुलीच्या अचानक मृत्यूने विष्णू हादरून गेला, पण त्याने आपल्या मुलीचे अंतिम संस्कार करून मैदानात उतरून आपल्या संघासाठी शतक झळकावले.

चंदीगडविरुद्ध विष्णूने १२ चौकार लगावून १०४ धावाचे लक्ष्य साध्य केले. बडोदा क्रिकेट असोसिएशनने त्याचा उल्लेख “वास्तविक हिरो” असा केला आहे. आपले वैयक्तिक आयुष्य मधी न येऊ देता, धैर्याने त्याने सामन्यामध्ये उतरून चांगली कामगिरी केली. त्याची ही धाडसी खेळी पाहून सगळेच सलाम ठोकत आहेत. त्याचवेळी,  सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफी खेळणारा फलंदाज शेल्डन जॅक्सनने ट्विट केले आणि लिहिले की, ‘मला इतके कठीण खेळाडू माहित नाहीत. विष्णू आणि त्यांच्या कुटुंबियांना माझा सलाम. मला आता त्याची अशी आणखी शतके पाहायला आवडेल.

असाच काहीसा किस्सा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बाबतीत सुद्धा घडला होता. १९९९ सालच्या विश्वचषकामध्ये त्याचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते. परंतु त्याच्या आईने दिलेल्या भावनिक आणि मानसिक पाठिंब्यामुळे सचिनने शतक झळकावले. सचिनने सांगितले कि, घरी आल्यावर आईकदे बघून मी खूप भावूक झालो होतो. माझ्या वडिलांच्या जाण्याने ती आतून खूप तुटली, पण त्या दु:खाच्या काळातही मी घरी राहू नये अशी तिने इच्छा व्यक्त केली आणि मी आपल्या संघासाठी खेळावे अशी तिची इच्छा होती. केनिया विरुद्ध सामन्यामध्ये मी १०१ चेंडूत १४० धावा केल्या होत्या, जेव्हा मी केनियाविरुद्ध शतक ठोकले तेव्हा मी खूप भावूक झालो होतो.

RELATED ARTICLES

Most Popular