25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriबाळ माने गद्दार, अशा गद्दारांना थारा देऊ नका ! ना. रविंद्र चव्हाण

बाळ माने गद्दार, अशा गद्दारांना थारा देऊ नका ! ना. रविंद्र चव्हाण

रत्नागिरीतील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सडेतोड भूमिका घेतली.

“पक्षाशी किंवा पक्षाच्या विचारधारेशी जो गद्दारी करतो त्याला कधीही थारा देऊ नका. बाळ मानेंनी पक्षाच्या विचारधारेला तिलांजली दिली आहे, ते दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवू पहात आहेत. अशा स्थितीत त्यांना भाजपच्या कुणाही कार्यकर्त्यांनी सहकार्य करु नये, थारा देऊ नये. त्यांच्यासाठी आजवर पक्षाने खूप काही केले. प्रत्येक वेळी त्यांना ‘उजवे माप’ दिले. परंतु तरीही त्यांनी पक्ष विचारधारा सोडली. जो पक्षाच्या विचारांशी प्रतारणा करतो तो ‘गद्दार’ होय! अशा कुणाही गद्दाराला थारा देऊ नका. भाजपा प्रणीत महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व ५ जागा निवडून आल्या पाहिजेत आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले पाहिजे या इष्र्येने आपण काम करुया” असे जोषपूर्ण व खणखणीत प्रतिपादन ना. रविंद्र चव्हाण यांनी केले. रत्नागिरीतील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ना. रविंद्र चव्हाण यांनी सडेतोड भूमिका घेतली.

महायुतीचा मेळावा – रत्नागिरी, संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना. उदय सामंत यांनी आज अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वयंवर मंगल कार्यालयात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना राज्याचे बांधकाम मंत्री व कोकणातील भाजपचे प्रभारी ना. रविंद्र चव्हाण यांनी सडेतोड भूमिका जाहीर केली.

विचारधारेशी प्रतारणा – ना. रविंद्र चव्हाण यांनी सांगितले, “भाजपाला वैचारीक बैठक आहे. भाजपची विचारधारा आहे. भाजपच्या विचारधारेशी प्रतारणा करुन जे अन्य पक्षांसोबत हातमिळवणी करतात ते ‘गद्दार’ होत. भाजपच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या अशा गद्दारांना कदापी सहाय्य वा सहकार्य करु नका” असे त्यांनी सडेतोडपणे सांगितले.

बाळ मानेंची गद्दारी ! – ना. रविंद्रचव्हाणकणखरपणेबोलत होते. त्यांनी सांगितले, “बाळ माने यांनी पक्षाच्या विचारधारेशी प्रतारणा करुन अन्य पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. असे करणे म्हणजे ‘गद्दारी’ होय. म्हणूनच ‘गद्दारी’ करणाऱ्या बाळ मानेंना भाजपच्या कुणाही कार्यकर्त्याने थारा देऊ नये” अशा खणखणीत शब्दात त्यांनी सारे स्पष्ट केले.

पक्षाने त्यांना खूप दिले – ना. रविंद्रचव्हाणयांनीपुढेसांगितले, “भाजपने बाळ माने यांच्यासाठी खूप काही केले. पक्षाने त्यांना आमदारकी दिली. केवळ एकदा नव्हे तर चार वेळा पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली, जिल्हाध्यक्ष पद दिले. महाराष्ट्र पातळीवर महत्त्वाचे पद दिले… हे सर्व केले” अशा शब्दात त्यांनी सारे कथन केले.

‘उजवे माप’ दिले – ना. रविंद्र चव्हाण पोटतिडकीने बोलत होते. त्यांनी सांगितले, “मी बांधकाम मंत्री या नात्याने माझ्या बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील निधी देताना बाळ माने यांना नेहमीच ‘उजवे माप’ दिले. अशा स्थितीत आपल्याला कर्तव्य प्रथम मानून पक्षहिताला साथ द्यायला हवी” असे त्यांनी स्पष्ट केले.

सडेतोड भूमिका – ना. रविंद्र चव्हाण कोणती भूमिका जाहीर करणार याकडे भाजपच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. ना. रविंद्र चव्हाण यांनी अतिशय स्वच्छ व सडेतोड भूमिका जाहीर केल्याने भाजप तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular