बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ फेब्रुवारी २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ फेब्रुवारी २०२२
बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II), सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) पदाची भरती केली जाणार आहे. दोन्ही पदाच्या मिळून ५०० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. ही पदभरती ५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ :- www.bankofmaharashtra.in
सामान्य अधिकारी स्केल २ या पदाच्या ४०० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनमध्ये ६० टक्केहून अधिक गुण असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. सीए/सीएमए/सीएफए हे शिक्षण असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पदभरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
सामान्य अधिकारी स्केल ३ या पदाच्या १०० जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवाराकडे अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनमध्ये ६० टक्केहून अधिक गुण असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. सीए/सीएमए/सीएफए हे शिक्षण असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पदभरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :-
या दोन्ही पदभरतीसाठी उमेदवाराचे वय २५ ते ३८ वर्षांदरम्यान आहे.
अर्ज शुल्क :-
जनरल/ ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस उमेदवारांनी ११८० रुपये अर्ज शुल्क भरायचा आहे.
एससी किंवा एसटी उमेदवारांना १८० रुपये
तर अपंग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. खालील लिंक वर क्लिक करून आपण अर्ज भरू शकता
बॅंक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन या पदासाठी अर्ज भरता येणार आहे.
पूर्ण नोटिफिकेशन खालील लिंकवर उपलब्ध
Bank of Maharashtra Notification
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.