26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRajapurरिफायनरी समर्थक आणि विरोधकांनी घेतली खास.विनायक राऊतांची भेट

रिफायनरी समर्थक आणि विरोधकांनी घेतली खास.विनायक राऊतांची भेट

राजापूरमधील संभाव्य बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी आणि न होऊ देण्यासाठी समर्थक आणि विरोधकांची मोठ्या प्रमाणात रणनिती सुरु आहे. खास. विनायक राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांनी रविवारी माझी भेट घेतली. रिफायनरी समर्थकांना आम्ही खासदार या नात्याने त्यांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी वेळ दिला होता त्यानुसार सर्व समर्थक हजर होतेत. त्याचप्रमाणे, नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे शिष्टमंडळ आणि बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे शिष्टमंडळ आम्हाला भेटून गेले आणि त्यांनी आम्हाला निवेदनही सादर केले आहे.

पुढे सांगताना खास. राऊत म्हणाले कि, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही बहुमताच्या बाजुने नक्कीच असणार आहे आणि यात कोणताही बदल होणार नाही. बारसू परिसरातील रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आलेली निवेदने आम्ही जशास तशी मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असून, ती साधारण २८ किंवा २९ ऑगस्टच्या दरम्यान ही निवेदने मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करेन. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री जो काही निर्णय देतील, त्या अनुषंगाने आम्ही पुढे लोकप्रतिनिधी म्हणून काम करु. बारसू रिफायनरी बाबत सरकारचा निर्णय नसल्याने शिवसेना पक्ष त्याबाबत अद्याप काहीही भूमिका घेऊ शकत नाही. असे मत खासदार विनायक राऊत यांनी रविवारी राजापूर येथील बैठकीत व्यक्त केले.

तसेच सरकारने बारसू रिफायनरी प्रकल्प अद्याप जाहिर केलेला नसून, राज्य सरकार बहुमत पाहूनच योग्य तो निर्णय घेईल. नाणार रिफायनरी हा विषय संपलेला असल्याने, त्या भागातील लोकांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे देऊ शकणार नाही असे मी स्पष्ट सांगितले आहे. यावेळी आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष जमीर खलिफे, अॅड.शशिकांत सुतार, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके,  अॅड.यशवंत कावतकर, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, जगदीश राजापकर, विनायक दिक्षीत, सुरज पेडणेकर, गौरव परांजपे आदी उपस्थित होतेत.

RELATED ARTICLES

Most Popular