24.4 C
Ratnagiri
Wednesday, November 13, 2024

हरचिरी-उमरेत पकडली ७६ वानर-माकडे , आंबा बागायतदारांना दिलासा

गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात...

चिपळूणचे मटण, मच्छीमार्केट १८ वर्षे बंद

चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर...

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी...
HomeMaharashtraमागील दीड वर्ष बंद असलेल्या चित्रपटगृह चालकांनी बेसिक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे-...

मागील दीड वर्ष बंद असलेल्या चित्रपटगृह चालकांनी बेसिक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे- मुख्यमंत्री

२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स ॲन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे प्रत्यक्ष भेट घेतली.

राज्यशासनाने शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे सुरु करायची परवानगी दिल्यानंतर, आत्ता राज्यातील विविध चित्रपटगृहे सुद्धा उघडण्यास मान्यता दिली असून, येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपट गृहे काही अटी आणि शर्थीवर सुरु करण्यात येत आहेत. राज्यातील मागील दीड वर्ष बंद असलेल्या चित्रपटगृह चालकांनी गृहाच्या बेसिक गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामध्ये अग्नी, स्थापत्यविषयक योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच मग चित्रपटगृहे सुरू करावीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स ॲन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि, आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी विचारविनिमय सुरु असून , लवकरच योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  परिवहन मंत्री ॲङ अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे इत्यादी संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमागृह परवान्यांचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकीटामागे २५  रुपये सर्व्हिस चार्जेस आकारण्यास परवानगी द्यावी, विद्युत वापर नसल्याने देयके कमीत कमी वापरावर आधारित असू नये, मिळकत कर आकारू नये,  अशा विविध प्रकारच्या मागण्या असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत. असोसिएशनच्या वतीने या मागण्या पूना एक्झिबिटर असोसिएशनचे सदानंद मोहोळ,  अशोक मोहोळ, नितीन दातार, निमेश सोमय्या, प्रकाश चाफळकर यांनी सादर केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular