लहान वयात गायलेल्या एका गाण्याने अल्पावधीतच अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेला सहदेव दिरदो. सर्वाना आठवतच असेल कि, त्याचे सहज पद्धतीने म्हटलेलं ‘बसपन का प्यार’ गाणे. या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेला बाल कलाकार सहदेव दिरदो.
कुटुंबासोबत दुचाकीवरून प्रवास तीघ जण प्रवास करत असताना तो सर्वात पाठी बसला होता. तेंव्हा अपघात झाल्यावर त्याला चांगलीच दुखापन झाली आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सहदेवचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये त्याच्या डोक्यावर इतका जबर मार बसला आहे, कि बऱ्याच तासांनंतर तो उशिरा शुद्धीत आला आहे. सहदेवला रुग्णवाहिकेतून घेऊन जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरपासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर असलेला सुकमा जिल्हा माओवाद्यांचा गड म्हणून ओळखला जातो तिथे सहदेव त्याच्या कुटुंबा सोबत राहतो. तो सध्या सातवीत शिकतो आहे. येथील अनेक गावांमध्ये आजही साधे रस्तेसुद्धा पोहोचलेले नाहीत. सध्या मात्र हा परिसर सहदेव आणि त्याच्या गाण्यामुळं चर्चेत आला आहे.
सहदेवच्या कुटुंबाची परिस्थिती फारच गरिबीची आहे. वडील शेतकरी असून ते अशिक्षित आहेत. त्यांना धड हिंदी भाषा सुद्धा नीट बोलता येत नाही. ते केवळ गोंडी भाषेतच संवाद साधू शकतात. त्यांच्या घरामध्ये टीव्ही, मोबाइल अशी कोणतीही उपकरणे नाहीत. परंतु, सहदेवनं त्यांच्या बाजूच्या घरात टीव्हीवर हे गाणे ऐकलेलं आणि त्यानुसार पाठ करून तो ते म्हणत असे. सहदेवच्या शाळेतील एका शिक्षकाने हा व्हिडीओ शूट करून तो इंटरनेटवर व्हायरल केला आणि त्याला प्रसिद्धी मिळाली.