निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाज अखेर पाच वर्षांनंतर भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. जहाजाचे काही भाग कापून ते क्रेनने किनाऱ्यावर काढण्यास सुरुवात झाली. एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनीने या संदर्भात केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केला. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाजाचा मुक्काम अजून वाढला आहे. २ जून २०२५ या जहाजाला किनाऱ्यावर अडकून पाच वर्षे झाली आहेत. किनारा सुरक्षेच्यादृष्टीने हे जहाज हटवण्यास यंत्रणांना पाच वर्षांनंतर यश आले. ३५ कोटींचे हे जहाज अवघ्या २ कोटींमध्ये भंगारात काढण्यात आल्याचे समजते. त्यासाठी एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनी या संदर्भात कस्टम, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार सुरू केला आहे. मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाज भंगारात काढल्यानंतर त्याचे तुकडे करण्यास सुरुवात केली आहे.
सेल्फी पॉईंट ठरलेले हे जहाज पुढील काही दिवसांत नष्ट होणार आहे. गुजरात येथून केरळच्या दिशेने जाणारे बसरा स्टार हे जहाज वादळात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लाटांच्या माऱ्यामुळे ते मिऱ्या किनाऱ्यावर येऊन धडकले होते. या वेळी एनडीआरएफच्या मदतीने या जहाजावरील कॅप्टन व खलाशांना वाचवले होते. ३५ कोटी किंमत असलेले हे जहाज मागील पाच वर्षे मिऱ्या किनाऱ्यावर लाटांचा मारा झेलत उभे होते. पाच वर्षांत त्याची डागडुजी न झाल्यामुळे ते गंजून गेले होते. त्याचा काही भाग वाळूत रूतला होता आणि काही दिवसांपूर्वीच ते जहाज मधून मोडले. अखेर ते जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र काही परवानग्या उशिरा मिळाल्यामुळे एप्रिल-मेमध्ये ते जहाज मिऱ्या येथून काढण्यास सुरुवात झाली नव्हती. भंगार विक्रेत्याने हे जहाज तोडण्याचे काम सुरू केले आहे.
आधीच झाले दोन तुकडे – पावसाळी वातावरण असल्याने समुद्र खवळलेला आहे. मोठ्या व उंच लाटा या जहाजाला धडकत असून, या जहाजाचे आधीच दोन भाग झाले आहेत. हे भाग दोन वेगवेगळ्या दोरखंडाने बांधून ठेवले आहेत. येत्या काही दिवसात पावसाळी वातावरणाचा अंदाज घेऊन सुरक्षितरीत्या ते तोडले जाणार आहे.