25 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeRatnagiriबावनदीचा उड्डाणपूल चार महिन्यांत सुरू, सत्तर टक्के काम पूर्ण

बावनदीचा उड्डाणपूल चार महिन्यांत सुरू, सत्तर टक्के काम पूर्ण

पुलावरून वाहतूक सुरू होण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी जाईल.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी येथे नवीन उड्डाणपूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येथील उड्डाणपुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे; मात्र पुलावरून वाहतूक सुरू होण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी बोगदा ते आरवलीपर्यंतच्या दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू आहे. आरवलीपासून संगमेश्वरपर्यंत जवळपास एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूक सुरू आहे. सावर्डे, वहाळ फाटा, आरवलीपासून संगमेश्वरपर्यंतचे जोडरस्ते डांबरी केले जात आहेत. संगमेश्वर उक्षीपर्यंत एक लेन काही भाग सोडल्यास पूर्ण होत आली आहे.

वांद्रीपासून निवळीपर्यंत आणि हातखंबा येथील काही ठिकाणी रस्त्याची अवस्था अजून बिकट आहे; मात्र बावनदीवरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलासाठी बावनदीत २०२१ मध्ये पिलर उभारण्यात आले होते; मात्र आरवली ते हातखंबादरम्यानचे कामच रखडले होते. त्यामुळे पुलाचे काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे नदीत उभारलेले पिलर केवळ शोभेचे बाहुले म्हणून उभे होते. चार महिन्यांपूर्वी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून, ते युद्धपातळीवर सुरू आहे.

आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाचे काम सुरू असताना जुन्या पुलावरून नियमित वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हे काम करताना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही. कामाचा चालकांना त्रास झाला नाही. हे काम ईगल कंपनीकडून सुरू आहे. आवश्यक त्या ठिकाणी मातीचा भरावही केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular