रत्नागिरीतील खोदलेले रस्ते आणि अद्ययावत पाण्याची सुविधा, अंडर ग्राउंड विजेच्या वाहिन्यासाठी अख्खी रत्नागिरी खोडून काढली गेली आहे. त्यातच आज आठवडा बाजार मध्ये पाण्याची पाईप लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे.
गेले अनेक महिने खूप चर्चेत सुरु असलेल्या रत्नागिरी शहरातील नव्या नळपाणी योजनेचे काम पूर्ण होण्या अगोदरच पाईप लाईन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आठवडा बाजार येथे असणारी पाईपलाईन फुटल्याने गळती होऊन सर्व रस्त्यावर ठीकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. मग या गळणाऱ्या पाइपचा बंदोबस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा आणण्यात आली.
पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेच्या कामामुळे शहरातील अनेक रस्ते गेले काही महिन्यांपासून खोडून ठेवण्यात आले आहेत. आत्ता या योजनेचे काम पूर्णत्वास आले असून आता नागरिकांना मुबलक पाणी मिळणार असण्याच्या घोषणा वारंवार होताना दिसत असताना, पाईप लाईन च फुटल्याने नक्की पाईप कोणत्या दर्जाचा वापरण्यात आला आहे याची कुजबुज सुरु आहे.
पाईपलाईनचे काम सुरू असताना नगरपरिषदेचे त्यावर कोणतेही नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. अनेक वेळेला जुन्या नळपाणी योजनेचे पाइप फुटण्याचे व नव्या पाईपलाईनमध्ये ही गळती लागण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आज आठवडा बाजार येथे नव्या पाईपलाईन गळती लागल्याने नळपाणी योजनेचा शुभारंभ होण्या आधीच असे प्रकार घडत असल्याने या कामाच्या दर्जाबाबत आता नागरिकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. योजना राबवताना अनेक त्रुटी असून त्याचा परिणाम नंतर दिसून येणार असल्याचे नागरिकांच्यात बोलले जात आहे