27.6 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplun“त्यांनी” राजीनामा देण्याआधी त्यांची हकालपट्टी करावी – शिवसैनिकांची मागणी

“त्यांनी” राजीनामा देण्याआधी त्यांची हकालपट्टी करावी – शिवसैनिकांची मागणी

आमदार चव्हाण यांचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांमधून देखील आधी शिवसेनाला रामराम ठोकण्याची तयारी सुरू झाली आहे.

येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत माजी आमदार चव्हाण यांनी कायम खालचा दर्जाची वागणूक दिल्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पण त्यामुळे कोकणात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. विशेषतः चिपळूण शहरातून व ग्रामीण भागातूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने हि बाब शिवसेनेला त्रासदायक ठरू शकणार आहे. त्यासाठी जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम व त्यांचे अन्य सहकारी तेथील विभागाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आमदार चव्हाण यांना समर्थन दर्शवणाऱ्यांची हकालपट्टी करावी, असा एकसाथ सूर उमटू लागला आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट निर्माण झाल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यातील ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत उमटू लागले आहेत. त्यातच उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार योगेश कदम शिंदे गटात सामील झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये उभी फूट पडू लागली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात सामील होत असल्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर कोकणातील शिवसेनेला एक मोठा धक्का बसला आहे.

आदित्य ठाकरे यांची देखील निष्ठा यात्रा सुरु झाली आहे. शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या पार्श्वभूमीवर सलग बैठका घेतल्या जात आहेत. जे शिंदे गटात सामील होणाऱ्या सदानंद चव्हाण यांना पाठींबा देणार आहेत यांना राजीनामा द्यायच्या आधीच हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून जोर धरत आहे. त्याच वेळी आमदार चव्हाण यांचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांमधून देखील आधी शिवसेनाला रामराम ठोकण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आधी हकालपट्टी की आधी राजीनामा याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चिपळूणच्या माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात सामील होण्याच्या घेतलेल्या निर्णयात चिपळूणची ८० टक्के शिवसेना सामील असल्याचेही त्यांनी विशेष नमूद केले आहे. त्यामुळे चिपळूण शिवसेनेला फार मोठा भगदाड पडणार असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular