27.6 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeTechnologyसेलमध्ये खरेदी करता आहात ! एवढ लक्षात असू द्या

सेलमध्ये खरेदी करता आहात ! एवढ लक्षात असू द्या

ऑनलाइन शॉपिंग करताना लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून कोणत्याही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही.  

देशातील प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्स अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ३ ऑक्टोबरपासून सेलचे वारे वाहू लागले आहेत. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये अनेक ऑफर्स आणि विविध प्रोडक्टवर भरघोस सूट मिळते आहे.

सेल म्हटल्यावर लोक खरेदी करण्यासाठी तुटून पडतात. परंतु शॉपिंगवेळी अशा काही गोष्टींकडे देखील लक्ष देणे गरजेचं असते,  ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही फसवणुकीचा सामना करावा लागणार नाही. अनेक ऑफरमध्ये कॅशबॅक दिली जाते, पण प्रत्येक  कॅशबॅकपासून सावध राहणे गरजेचे असते. अनेकदा ही कॅशबॅक ऑफर पैसे कमावण्याची स्किम असते. वस्तू विकणारे कॅशबॅकची ऑफर देवून काही वेळा ग्राहकांकडून त्यांच्या बजेट बाहेरील वस्तू खरेदी करून घेऊन, त्याला कॅशबॅकचं नाव देतात.

काही वेळा एमआरपी वर सेलमध्ये ७०-८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. पण या सूटमध्ये एमआरपी कडे लक्ष दयावे. अनेकदा वस्तूवर दिलेली सूट आणि खरी किंमत यातील मार्जिन कमी असत, परंतु,  एमआरपी अशा प्रकारे लिहिली जाते, कि सूट दिलेला आकडा तुम्हाला अधिक वाटू लागतो.

अनेक वेबसाइट्सवर नो कॉस्ट ईएमआय हा ऑप्शन उपलब्ध असतो. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, नो कॉस्ट ईएमआय केवळ मार्केटिंगचा फंडा आहे, ज्यामध्ये कंपनी आणि बँक आधी पासूनचं सामिल असतात. नो कॉस्ट ईएमआयमध्ये प्रोडक्टची किंमत वाढवून सांगितली जाते आणि त्यातूनच बँकेचं व्याज भरलं जात  असल्याचं जाणकरांचं मत आहे.

नो कॉस्ट ईएमआयमुळे वस्तूची किंमत इतर ठिकाणीही तपासणं गरजेचं आहे. त्याशिवाय वस्तूच्या गॅरंटी आणि वॉरंटीबाबतही योग्य ती माहिती घेणं गरजेचं आहे. अशा गोष्टींकडे ऑनलाइन शॉपिंग करताना लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून कोणत्याही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular