29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSindhudurgकुडाळ पोलिसांची अटके संदर्भातील भास्कर जाधवांना नोटीस

कुडाळ पोलिसांची अटके संदर्भातील भास्कर जाधवांना नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबद्दल जनमानसात बदनामी, अब्रूनुकसानीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्ती संदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. या विरोधात महाविकास आघाडीनं कुडाळमध्ये काढलेल्या मोर्चाच्या सभेत भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबद्दल जनमानसात बदनामी, अब्रूनुकसानीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने जाधवांवर कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता कुडाळ पोलिसांनी अटकेसंदर्भातील भास्कर जाधव यांना नोटीस बजावली आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्यं केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकेसंदर्भातील नोटीस बजावली आहे.

भास्कर जाधव यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अपमानकारक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत ही नोटीस बजावण्यात आली आहे. सभेचे आयोजन करुन त्या सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बदनामीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात भाजपच्या फिर्यादीची दखल घेत, कुडाळ पोलिसांनी भास्कर जाधव यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular