26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeChiplunराजकारण पोहोचलं घरापर्यंत.. आम. जाधवांच्या घरावर हल्ला

राजकारण पोहोचलं घरापर्यंत.. आम. जाधवांच्या घरावर हल्ला

काल मध्यरात्री अज्ञाताकडून आमदार जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना ऊत आला आहे.

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञाताने दगडफेक आणि काही वस्तूंची फेकणूक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर अज्ञात असून नक्की कोणी हे कृत्य केले अथवा करवून घेतले याबाबत चर्चा सुरु आहेत. आमदार जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने जाधव यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यापासून आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वत्र दणदणीत विजय झाल्याने, गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आता आमदार भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड बाटल्या, स्टंम्प व अन्य वस्तू सापडल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये प्रत्यक्षात राडा होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर ही दगडफेक कुणी केली हे अद्याप जरी माहीत नसले तरी, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेऊन त्या संदर्भातील तपास सुरू केला आहे. आमदार जाधव सध्या मुंबईमध्ये आहेत.  काल मध्यरात्री अज्ञाताकडून आमदार जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना ऊत आला आहे.

सर्वत्र राजकारण इतक्या खालच्या पातळीवर पोहोचल्याची चर्चा सुरु आहे. कि राहत्या घरावर अज्ञात जण हल्ले करू लागले आहेत. आम. जाधव जरी तिथे त्या वेळी वास्तव्याला नसले तरी सुद्धा त्यांचे संपूर्ण कुटुंब तिथे वास्तव्य करते. त्यामुळे इतरांना हानी पोहोचण्याची शक्यता होती.

RELATED ARTICLES

Most Popular