27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriआ. भास्करशेठ जाधवना भिडणार खा. श्रीकांत शिंदेंचे मेहुणे!

आ. भास्करशेठ जाधवना भिडणार खा. श्रीकांत शिंदेंचे मेहुणे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र यांचे मेहूणे विपुल कदम यांचे नाव पुढे आले आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपला मिळेल असे बोलले जात असताना आणि त्या अनुषंगाने माजी आमदार डॉ. विनय नातू हे तयारीला लागले असतानाच शिवसेनेने (शिंदे गट) या मतदारसंघावर दावा केला असून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदे यांचे मेहणे विपूल कदम यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या हालचाली करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. डॉ. विनय नातूंसह भाजपचे नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खा. निलेश राणे यांनी देखील शिवसेना नेते आणि या मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्याविरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेवर देखील शिंदे गटाच्या भुमिकेने पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. गुहागर मतदारसंघ कित्तेक वर्ष व भाजपकडे होता. मात्र २००९ साली हा मतदारसंघ भाजपाच्या हातातून गेल्यावर भास्कर जाधव यांनी या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व राखलं आहे.

भास्कर जाधवांविरोधात शड्ड – भास्कर जाधव यांचे वर्चस्व मौडीत काढण्यासाठी आता या निवडणुकीत महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गेले काही दिवस शांत असलेले भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सक्रियपणे गाठीभेटी व ज कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. आता अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपुल कदम यांचे नाव अचानक पुढे आले आहे. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता महायुतीच्या जागावाटपामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेना की भाजपा कोणाच्या वाटेला येतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

भास्कर जाधव यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेकडून गुहागरमधून निवडणूक लढवली होती व त्यांचा विजयही झाला होता. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरुन श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. अशावेळी माजी आ. डॉ. विनय नातू आणि भाजपा यांची भुमिका काय राहते याकडे लक्ष लागले आहे. नातू यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular