21.5 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeSportsभारताच्या भविना पटेलला पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक

भारताच्या भविना पटेलला पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यावर आत्ता सर्वांचे लक्ष पॅरालिंपिकवर आहे. नक्की काय असत पॅरालिंपिक. जाणून घेऊया थोडक्यात.

हि पॅरालिंपिक स्पर्धा खास करून शारीरिकदृष्या अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंसाठी आयोजित केली जाते. हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक यामध्ये फरक आहे. प्रत्येक खेळ प्रकारामध्ये, खेळाडूंच्या शारीरिक अपंगत्वाची पाहणी केली जाते. त्यामुळे त्यातील काही खेळ हे सर्व प्रकारच्या अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी खेळता येण्यासारखे असतात तर काही खेळ हे फक्त विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी राखीव ठेवले जातात. यामागे फक्त एवढाच दृष्टीकोन समोर ठेवला जातो कि, सर्व खेळाडूंना जिंकण्यासाठी समान संधी मिळावी, आणि त्याचप्रमाणे काही नियम निश्चित केले जातात.

भारताच्या भविना पटेलनं टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवून इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिस विभागाच्या स्पर्धेत पदक जिंकणारी भविना हि भारताची पहिलीच खेळाडू आहे. भविना पटेलनं आपल्या पहिल्या वहिल्या  पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. अखेरच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे सुवर्णपदाचं स्वप्न मात्र अधुरं राहिले तरी भविनाने रौप्य पदकाची कमाई करून इतिहास रचला आहे.

भविनाकडे सुवर्ण पदक कमावण्याची संधी होती, अंतिम सामन्यामध्ये चीनच्या यिंगनं तिचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली, १९ मिनिटं चाललेल्या या सामन्यामध्ये भविना पटेलची चिनच्या यिंगशी लढत होती. पण यिंगनं सलग सेटमध्ये भविनावर दबाव टाकून खेळी केल्याने भाविनाचा पराभव झाला आणि यिंगनं हा तिसरा सेटही ११-६ च्या फरकाने जिंकत सुवर्ण पदक आपल्या नावे केल.

आतापर्यंत भारतीय पॅरालिंपिकपटूंनी १२  पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४  पदकं मिळवली आहेत. भविना पटेलचा टोकियो पॅरालिम्पिकमधील प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला असून, व्हील चेअरवर बसून खेळणाऱ्या भविनानं, केलेल्या दमदार खेळानं सर्वांच्याच मनात स्पेशल स्थान निर्माण केल आहे.

RELATED ARTICLES

Most Popular