27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeKhedभोस्ते सरपंचासह काडवली येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश, भास्कर जाधव यांना मोठा धक्का

भोस्ते सरपंचासह काडवली येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश, भास्कर जाधव यांना मोठा धक्का

मंत्री रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत (शिद गट) प्रवेश केला.

तालुक्यातील काडवली हुमणेवाडी, कांगणेवाडी, झगडेवाडी, डांगेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांच्या पुढाकाराने शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत (शिंदे गट) नुकताच जामगे येथे प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. ‘काडवली हूमणेवाडी, ‘कांगणेवाडी, झगडेवाडी, डांगेवाडी येथील ग्रामस्थांनी तसेच भोस्ते सरपंच सौ रेवती राजेश पाटील यांचाही शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत (शिद गट) प्रवेश केला. यावी काडवली व भोस्ते गावात मंजूर झालेल्या विकास कामांचे पत्र दिले.

यामध्ये काडवली झगडेवाडी रस्ता डांबरीकरण करणे काडवली काजवेवाडी येथे स्मशान शेड बांधणे, काडवली झगडेवाडी येथे स्मशानशेड बांधणे, काडवली गजवाडी मुख्य रस्ता डांबरीकरण करणे, काडवली कांगणेवाडीसाठी संयुक्त स्मशान शेड बांधणे, काडवली बौध्दवाडी, रोहिदासवाडीसाठी संयुक्त स्मशानशेड बांधणे, काडवली डांगेवाडी मुख्य रस्ता ते गणेश मंदिर रस्ता डांबरीकरण करणे, या कामांचा समावेश आहे. या विकासकामांसह प्रलंबित विकासकामांसाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी परशुराम कांगणे, श्रीकांत कांगणे, कृष्णा कांगणे, प्रकाश कांगणे, बबन कांगणे, सुरेश घरवी, सुनील कांगणे, दत्ताराम कांगणे, आत्माराम कांगणे, नारायण कांगणे, रामचंद्र हुमणे, संभाजी हुमणे

किशोर नवले, विनोद गजमल, दत्ताराम गजमल, बाबू गजमल, नारायण खाडे, रामचंद्र पड्याळ, सिताराम पड्याळ, गणेश गोरीवले, पांडुरंग चव्हाण, परशुराम जाधव, अनंत आग्रे, अनंत काजवे, मारुती राणीम, एकनाथ घडशी, संदीप काजवे, सुमती राणीम, वनिता गोरीवले, सुमित्रा काजवे या प्रवेशकर्त्या ग्रामस्थांचा समावेश आहे. तर प्रलंबित विकास कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी यावेळी दिली. यावेळी लोटे उपविभाग प्रमुख निलेश चव्हाण, रवींद्र महाडिक, भेलसई शाखाप्रमुख अंकुश कदम, आप्पा महाडिक, अक्षय गव महाडिक, लक्ष्मीकांत पालांडे, ओंकार चव्हाण, चंद्रकांत मोहिते, सचिन मोहिते, काडवली ग्रामपंचायत सदस्य सुधाकर चव्हाण, मानसिंग सुर्वे, ओंकार चिले आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular