असून किनाऱ्यावर लाटांचे तांडव गेले २-३ दिवस समुद्र खवळला पहायला मिळत आहे. रत्नागिरीनजीकच्या प्रसिद्ध तिर्थक्षेत्र गणपतीपुळे समुद्राला मोठे उधाण आले असून उंचच उंच लाटा उसळत आहेत. या लाटा समुद्रकिनारी असलेल्या गणपती मंदिराच्या भींतीवर तसेच संरक्षक भींतीवर आदळत आहेत.उंचचउंच उसळणाऱ्या लाटांनी ऊरात धडकी भरत आहे. सध्या गणपतीपुळ्यात समुद्र चौपाटीवर जाण्यास पर्यटकांना आणि भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
समुद्रस्नानासाठी कोणीही जावू नये असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत, प्रशासन, पोलीस आणि देवस्थानच्यावतीने भाविकांना करण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यावर ग्रामपंचायतीने जीवरक्षक तैनात केले आहेत. समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. अजून काही दिवस समुद्र खवळलेला राहिल असा जाणकारांचा अंदाज आहे.