23.3 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeRatnagiriएसटी निवारा शेडमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाला मिळाला मदतीचा हात

एसटी निवारा शेडमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाला मिळाला मदतीचा हात

मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्याने दामू पवार या आदिवासी बांधवाचे घराचे छप्पर उडाले, घराच्या भिंती मातीच्या असल्याने त्या देखील कोसळल्या

मागील दोन वर्षापासून सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक संसार कोलमडले. तर काही कुटुंबीय अद्यापही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मंडणगड तालुक्यातील पवार कुटुंबावर अशीच दयनीय अवस्था आली आहे. राहायला घर नसल्यामुळे हे कुटुंब कादवण येथील एका पडलेल्या एसटीच्या निवारा शेडमध्ये राहत असल्याची माहिती मिळताच बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, तालुकाध्यक्ष गुलाबराव अहिरे, सदस्य अरुण वळवी हे बिरसा फायटर्स आदिवासी कार्यकर्ते कादवण येथील बेघर आदिवासी कातकरी कुटुंबाच्या मदतीला धावून गेले.

मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्याने दामू पवार या आदिवासी बांधवाचे घराचे छप्पर उडाले, घराच्या भिंती मातीच्या असल्याने त्या देखील कोसळल्या. त्यासोबतच एक धक्कादायक बाबही समोर आली आहे कि, दामू पवार या कुटुंब प्रमुखाचेच आधार कार्डवरील नाव चुकले असल्यामुळे या कुटुंबांला शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही. तेंव्हापासून दामू पवार आणि कुटुंबीय एसटीच्या निवारा शेडमध्ये राहत आहेत. त्या कुटुंबाला बिरसा फायटर्स संघाने मदत देऊ केली आहे.

बिरसा फायटर्स व आदिवासी कर्मचारी परिवार रत्नागिरी यांच्याकडून तातडीने आर्थिक व वस्तूरूप मदत तातडीने जमा करून ती आज या बेघर झालेल्या आदिवासी कुटुंबाला मदत करण्यात आली. यामध्ये ३ महिने पुरेल एवढे किराणा सामान, धान्य, कपडे भांडी आदी वस्तुरूप मदत करण्यात आली. यावेळी कादवण गावाचे पोलिस पाटील, ग्रामस्थ व कादवण गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.

या बेघर झालेल्या कुटुंबाची गावातील एका वाड्यात तात्पुरती राहण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस पाटील यांनी दिली. या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी राखत बिरसा फायटर्स कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे शतशः आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular