25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeMaharashtraयंदाचा गणेशोत्सव, कापडी फेटे, धोतर आणि हिरेजडीत अलंकारांच्या मूर्तीना विशेष प्राधान्य

यंदाचा गणेशोत्सव, कापडी फेटे, धोतर आणि हिरेजडीत अलंकारांच्या मूर्तीना विशेष प्राधान्य

पैठणी, जरीचे कापड अशा विविध रंगाचे कापड घेवून हे फेटे आणि धोतर तयार करून मूर्तीची सजावट केली जात आहे.

अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. मागील दोन वर्षे श्रीक्षेत्र गणपतीपुळे श्रींच्या मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव बहूतांश कमी झाल्यामुळे यंदा भक्तगणांमध्ये खूपच उत्साह दिसून येत आहे. गणपतीपुळेत रविवारपासून भाद्रपदी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून १ सप्टेंबर २०२२ रोजी भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. दिवसभरात चार हजारहून अधिक भक्तगणांनी दर्शन घेतले.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी सकाळी श्रींची महापूजा झाली. सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत पुजा, आरती, मंत्री पठण आदी कार्यक्रम झाले. दुपारी प्रसाद वाटप करण्यात आले. गणेशोत्सवासाठी पहिल्या दिवशी विविध प्रकारची फुलांची रांगोळी काढून गाभाऱ्यात सजावट करण्यात आली होती. शनिवार, रविवारी जोडून सुट्ट्या आल्यामुळे अनेकजणं गणपतीपुळेत दर्शनासाठी दाखल झाले होते. सकाळी महापुजेला गणपतीपुळे मंदिराचे ट्रस्टी, ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.

यंदाच्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवासाठी चित्रशाळेत गणेशमूर्ती तयार करण्याच्या व रंगरंगोटी करण्याची कामे संपुष्टात आली आहेत. मूर्तीकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात रंगीबेरंगी कापडी फेटे, नेसवलेले धोतर यासह हिरेजडीत अलंकारांनी सजवलेली मूर्तीना भाविकांची विशेष पसंती लाभल्यामुळे, त्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फेटा हा महाराष्ट्रात रूबाबाचे प्रतीक म्हणून असल्यामुळे त्याचा वापर मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी केला जात आहे. पैठणी, जरीचे कापड अशा विविध रंगाचे कापड घेवून हे फेटे आणि धोतर तयार करून मूर्तीची सजावट केली जात आहे. त्यावर आकर्षक असलेल्या कलाकुसरीमुळे फेटे व धोतर अधिकच मूर्तीची शोधा वाढवत असल्याने अनेकजण अशाच मूर्तीना विशेष पसंती देत असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.

मागील दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे गणेशोत्सव एकदम साधेपणाने साजरा करण्यात आला होता. सार्वजनिक मंडळानी देखील मागील दोन वर्षे साधेपणात घालवली, मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्याने या वर्षीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी मंडळे देखील सज्ज झाली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular