27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...

रत्नागिरी पोलिसांनी दोन दिवसांत गोव्यातून चोरांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. रत्नागिरी...
HomeMaharashtraसंजय राऊत प्रकरणी आता भाजपच्या कंबोज यांची उडी, शेअर केला व्हिडियो

संजय राऊत प्रकरणी आता भाजपच्या कंबोज यांची उडी, शेअर केला व्हिडियो

भाजप नेते मोहित कंबोज शेअर केलेल्या व्हिडियो मुळे खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांच्या राहत्या घरापासून ते त्यांच्या अलिबाग येथील मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर अनेक विरोधकांनी केलेल्या टीकेला राउतांनी प्रत्युत्तर देखील दिले. परंतु अजूनही हा विषय चघळला जात आहे. त्यामध्येच आता भाजप नेते मोहित कंबोज शेअर केलेल्या व्हिडियो मुळे खळबळ उडाली आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी मला सामना कार्यालयात बोलावून धमकावलं आणि २५ लाख रुपये घेतले असा सनसनाटी आरोप कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांनी व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत हा आरोप केला आहे.

मोहित कंबोज यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं की, संजय राऊत यांनी २०१४ साली सामनाच्या कार्यालयात मला बोलावून घेतलं आणि धमकवालं. त्यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले असून अद्याप ते परत केलेले नाहीत. या संदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत,  मी यासाठी तक्रार देखील करायला तयार आहे,  मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे या संदर्भात गुन्हा दाखल करुन घेणार का?  असं कंबोज यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भोंग्यांविरोधात केलेल्या विधानासाठी भाजप नेते मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दर्शविला आहे आणि आता प्रत्यक्षात मंदिरांवर हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत भोंगे वाटप करण्याची त्यांनी मोहिम राबवली आहे. यासाठी ज्यांना कोणाला मदत लागणार आहे त्यांच्यासाठी त्यांनी वैयक्तिक फोन नंबर देखील शेअर केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular