29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeMaharashtraमनसेच्या वसंत मोरेंची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी

मनसेच्या वसंत मोरेंची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी

राज ठाकरे यांनी एवढ्या जुन्या आणि जवळच्या वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन उतार करण्यात आल्याने पक्षाला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर अनेक वाद विवाद निर्माण झाले. मशीदीवरील भोंगे काढण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. यावेळी मनसेचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यास विरोध दर्शवल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुण्याच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरसेवक वसंत मोरे हे मनसेचे पुण्यातील एक प्रमुख नेते असून राज ठाकरे यांचे अतिशय जुने आणि  जवळचे कार्यकर्ते समजले जातात. पुण्यात मनसेचे वसंत मोरे व नगरसेवक साईनाथ बाबर हे दोनच नगरसेवक कार्यरत आहेत. राज ठाकरे यांनी एवढ्या जुन्या आणि जवळच्या वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन उतार करण्यात आल्याने पक्षाला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

वसंत मोरे हे देखील या सर्व प्रकरणाबाबत व्यक्त झाले आहेत. ते म्हणाले कि, गेली २७ वर्षे आपण राज साहेबांसोबत काम करतोय, त्यांची साथ मी सोडणार नाही. राज ठाकरें सोबतचा मोठी फ्रेम असलेला आपला फोटो यावेळी त्यांनी दाखवला. वसंत मोरे त्यावेळी काहीसे भावूक झालेले दिसून आले. राज ठाकरे माझ्या हृदयात आहेत आणि कायम असतील, असं देखील त्यांनी न विसरता सांगितले.

मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात राज ठाकरेंच्या विरोधात जाऊन पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेतल्यामुळे चर्चेत असलेले पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना अखेर शिवतीर्थवरुन बोलावणे आले आहे. त्यानुसार वसंत मोरे येत्या सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील मनसेचे पदाधिकारी बाबू वागस्कर यांनी सांगितले कि, वसंत मोरे यांना आपल्या भावना वेगळ्या पद्धतीने मांडायच्या होत्या, पण अर्थाचा अनर्थ घडला.

RELATED ARTICLES

Most Popular