27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriआमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची भाजपची मागणी

आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची भाजपची मागणी

दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होण्यास भास्कर जाधव जबाबदार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल शिवराळ आणि बदनामीकारक भाषा वापरण्यात आली. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होण्यास भास्कर जाधव जबाबदार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. जाधव यांच्यामुळे दोन गटांमध्ये दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण होऊन संघर्ष होईल अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.

त्यांच्या या कृत्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना चिथावणी मिळाली आहे. त्यातून दंगे घडून येण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या वेळी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण, प्रवक्ते नित्यानंद दळवी, धनंजय पाथरे, संकेत कदम, ययाती शिवलकर, अशोक वाडेकर, अक्षय चाळके, पिंट्या देसाई, श्रीनाथ सावंत, अक्षय पवार आदी उपस्थित होते.

माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरत बदनामीकारक वक्तव्य करून दोन राजकीय पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

डॉ. गर्ग यांनीही चौकशी करून कारवाईचे आश्वासन उपस्थितांना दिले आहे. अशा प्रकारचे निवेदन विविध ठिकाणी पाठवण्यात आले असून पुणे, कोल्हापूर येथील कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले आहेत. तेथेही आमदार जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular