27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeDapoliआंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

किनारा अस्वच्छ झाल्यामुळे निसर्ग आणि जलप्रदूषणात वाढ होईल.

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले किनाऱ्यावर गेलेले होते. त्या वेळी वाळूमध्ये पाऊल टाकायचे कसे आणि विसर्जन कशा पद्धतीने करायचे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. मागील तीन पिढ्या आंजर्ले ग्रामस्थ याच पद्धतीने श्री गणेश विसर्जन या किनाऱ्यावर करत आले आहेत; मात्र आजपर्यंत किनाऱ्यावर प्लास्टिक आणि काळपट द्रव कधीच पाहायला मिळाला नव्हता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कचऱ्यातून आणि प्रदूषित झालेल्या किनाऱ्यातून कशीतरी वाट काढत आंजर्ले ग्रामस्थांनी दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन केले; मात्र या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच किनाऱ्यावर साचलेल्या द्रवाबाबत विशेष तपासणी करावी, अशीही मागणी केली आहे. दरम्यान, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन किनारा स्वच्छ करण्याचा संकल्प केला असून, दापोली तालुका प्रशासनाने किनारा स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे.

…तर पर्यटनावर विपरीत परिणाम – आंजर्ले गाव गेल्या पाच वर्षामध्ये पर्यटनाच्या नकाशावर चमकू लागले आहे. पर्यटकांचा ओढा गावाकडे वाढत आहे; मात्र येथील किनारा अस्वच्छ झाला तर त्याचा पर्यटनावर परिणाम होईल. व्यावसायिकांची आर्थिक गणिते बिघडतील, अशी भीती ग्रामस्थांना आहे तसेच किनारा अस्वच्छ झाल्यामुळे निसर्ग आणि जलप्रदूषणात वाढ होईल. येथील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून, त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे परांजपे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular