24.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriब्लॅक पँथर, बिबट्याचा एकत्र वावर कोळंबेत दुर्मीळ योग

ब्लॅक पँथर, बिबट्याचा एकत्र वावर कोळंबेत दुर्मीळ योग

त्या परिसरात ब्लॅक पँथरचे वास्तव्य असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकाच ठिकाणी दिसल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. कोळंबे येथील ग्रामस्थांना घरी परतताना रस्त्यावर फिरणाऱ्या दोन्ही बिबट्यांचे दर्शन झाले. त्यांनी व्हिडिओ काढून व्हायरल केला आहे. त्या परिसरात ब्लॅक पँथरचे वास्तव्य असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. कोळंबे बंडबे-गोरिवलेवाडी येथे राहणारे साहिल तोस्कर रविवारी (ता. २१) रात्री चारचाकीमधून घरी परतत होते. त्याच वेळी त्यांच्या गाडीसमोर रस्त्यातच ब्लॅक पँथर आणि बिबट्या दिसला. ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकाच ठिकाणी दिसण्याची ही पहिली घटना आहे. या संदर्भात तोस्कर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, “काल रात्री एका रिक्षाचालकाने यासंदर्भात माहिती दिल्यानंतर प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास चारचाकी घेऊन गेलो. मोटारीच्या हेडलाईटच्या प्रखर प्रकाशाला घाबरून ब्लॅकपॅथर रस्त्याशेजारील झाडीकडे पळून गेला.

बिबट्या रस्त्याच्या बाजूला घुटमळत होता. काही वेळाने बिबट्या तो समोरून निघून गेला. काही काळ आम्ही सर्वजण त्याच ठिकाणी थांबून होतो. कारण रात्री या परिसरातून खासगी कंपनीत कामाला गेलेले काही लोक उशिरा गावात येत असतात. त्यांना यासंबंधी कल्पना देता यावी, यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो. “महिन्यापूर्वी ब्लॅक पँथर कोळंबे परिसरात पाहायला मिळाला होता. काल रात्रीच्या घटनेसंदर्भातची माहिती पोलिसपाटील समीक्षा हातिसकर यांनी वनरक्षकांच्या ग्रुपवर दिली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून फोन आला होता. त्यांनी भेटायला येतो आणि ती जागा पाहतो, असे सांगितले.

…तर ट्रॅप कॅमेरे लावणार – वनरक्षक विराज संसारे आणि वनपाल न्हानू गावडे आज दुपारी ३ च्या सुमारास कोळंबे परिसरात पाहणीसाठी आले होते. त्यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. या परिसरात चार-पाच दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. आता ब्लॅक पँथरचे वास्तव्य आहे, हे निश्चित झाले आहे. पुन्हा दर्शन झाले तर कॅमेरे लावून ट्रॅप करू, असे श्री. गावडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular