27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraदहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाचे महत्वाचे पाउल

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाचे महत्वाचे पाउल

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयं अध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले आहेत.

कोरोनामुळे शाळा आणि कॉलेज पूर्णवेळ सुरु नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा आणि कॉलेज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. पण दहावी आणि बारावीचे वर्ष हे आयुष्यातील महत्वाचा टप्पा असल्याने आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाकडून त्यांना दिलासा देण्यात आला आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे विषयनिहाय प्रश्नपेढ्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या प्रश्नपेढींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव खूपच कमी झाला आहे. लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, रिकाम्या जागा भरा, एक वाक्यात उत्तरे आदी प्रश्नांचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, यासाठी हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने हि प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही वारंवार केली जात होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून अशा प्रकारची प्रश्नपेढी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयं अध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले आहेत. असंही त्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव कमी व्हावा यासाठी यंदा अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच, परीक्षेची वेळ देखील वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular