27.6 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeChiplunवाशिष्ठीत बुडालेल्यांचे मृतदेह २४ तासानंतर सापडले...

वाशिष्ठीत बुडालेल्यांचे मृतदेह २४ तासानंतर सापडले…

तब्बल २४ तास शोध मोहीम सुरू होती. अखेर कोस्टल गार्डची पाणबुडी मागविण्यात आली.

वाशिष्ठी नदीच्या पात्रात रविवारी सायंकाळी बुडालेल्या दोघांच्या शोधासाठी स्थानिक ग्रामस्थांसह प्रशासनाने तब्बल २४ तास शोधमोहीम राबवली. स्पेशल एसआरटी पथकासह पाणबुड्यांच्या माध्यमातूनही शोध घेण्यात आला. अखेर २४ तासानंतर या दोघांचेही मृतदेह हाती लागले. अधिक वृत्त असे की, पावसाळी आनंद घेण्यासाठी. कुंभार्ली गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनाऱ्यावर ८ जण रविवारी गेले होते. त्यातील ६ जण नदीपात्रा बाहेर उभे होते. मात्र दोघेजण वाशिष्ठी नदीत आंघोळीसाठी पाण्यात उतरले. डोहाच्या प्रवाहात अडकून पडले. त्यानंतर ते गायबच झाले. तब्बल २४ तास शोध मोहीम सुरू होती. अखेर कोस्टल गार्डची पाणबुडी मागविण्यात आली. डोहापासून काही अंतरावर वाशिष्ठी नदीपात्रात अब्दुल कादीर नोशाद लासने (जिव्हाळा सुपर बाझार शेजारी) याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर काही वेळाने आतीक इरफान बेबल (बेबल मोहल्ला) याचाही मृतदेह डोहात सापडला.

८ विद्यार्थी – शहरालगतच्या मिरजोळी लगतच्या एका हायस्कूलमधील दहावीच्या वर्गात शिकणारे हे ८ विद्यार्थी एकत्रीतपण् पावसाळी आनंद घेण्याच्या उद्देशाने रविवारी सायंकाळी ४ वाजता निघाले आणि कुंभार्ली गणेशवाडी येथील वजहर या ठिकाणी पोहोचले. वाशिष्ठी नदीपात्रातच मोठा डोह असून तेथील्ल धबधबा व पाणी पाहून ते आकर्षी झाले आणि तेथे पोहायला गेले. काही वेळातच जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे ६ जण तातडीने पात्राबाहेर येऊन कातळावर उभे राहीले मात्र दोघेजण डोहातच आंघोळ करीत होते.

भोवऱ्यात सापडले – जोरदार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह आणखी वाढला. त्यामुळे अचानक डोहातील पाण्याची पातळी व तेथील भोवऱ्यात आतीक इरफान बेबल (बेबल मोहल्ला) अब्दुल कादीर नोशाद लासने (जिव्हाळा सुपर बाझार शेजारी, चिपळूण) हे दोघेही सापडले. का क्षणात ते दोघेही गायब झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी ६ वा. पर्यंत २ तासात या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले. काही जाणकारांच्या मदतीने हुक टाकून व त्यानंतर बांबूच्या साहाय्याने शोध घेण्यात आला. याशिवाय एक-दोन धाडसी तरुणांनी डोहात उतरून त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरिही काहीच हाती लागले नाही.

पाणबुड्या मागविल्या – महाड येथील एसआरटीच्या पथकाने त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तोही असफल ठरला. अखेर कोस्टल गार्डचे पथक मागवून दोन पाणबुड्या डोहात सोडल्या. त्यांना डोहातू ४ तास शोध मोहीम राबविल्यानंतर एकाचा मृतदेह सापडला. त्याआधी घटनास्थळापासून काही अंतरावर वाशिष्ठी नदी पात्रात अब्दुल कादीर नोशाद लासने याचा मृतदेह सापडला. या शोध मोहिमेसाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे व पोलिस कर्मचारी तळ ठोकून आहेत. सोमवारी दुपारी आमदा भास्कर जाधव यांच्यासह काँग्रेस- तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, सामाजिक कार्यकते नाजिम अफवारे यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular