24.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeChiplunबेपत्ता विवाहितेचा मृतदेह वाशिष्ठीच्या पात्रात सापडला

बेपत्ता विवाहितेचा मृतदेह वाशिष्ठीच्या पात्रात सापडला

तिच्या चप्पल आणि पर्स गांधारेश्वर पुलाजवळ सापडली होती.

वाशिष्ठी नदीच्या पात्रात संगमेश्वरमधील धामापूर येथील बेपत्ता विवाहिता ‘अपेक्षा चव्हाण हिचा मृतदेह अखेर दोन दिवसांनी सापडला. तिच्या चप्पल आणि पर्स गांधारेश्वर पुलाजवळ सापडली होती. मृतदेह सापडला असला तरी हा आत्मघात की घातपात ? हा सवाल कायम आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या महिलेसोबत नेमकं काय घडलं? तिचा मृत्यू कसा झाला याबद्दलचं गूढ वाढलं आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील विवाहित महिला अपेक्षा अमोल चव्हाण या महिलेचा मृतदेह चिपळूण तालुक्यातील मजरेकाशी येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात गुरूवारी सापडला. मंगळवारपासून ती बेपत्ता होती. चिपळूण पोलीस मागील दोन दिवसांपासून अपेक्षाचा शोध घेत होते. स्थानिकांच्या मदतीने सुरु केलेल्या शोधमोहिमेमध्ये अपेक्षाचा मृतदेह सापडला. अपेक्षासोबत काय घडलं हे अद्याप समोर आलेलं नाही.

मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनच्या सहाय्याने शोध – धामापूर येथील अपेक्षा चव्हाण ही घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. चौकशीनंतर अपेक्षा चव्हाणच्या मोबाईलचे लोकेशन चिपळूणमध्ये दिसून आलेः शहरातील गांधारेश्वर येथील पुलावर तिचा मोबाइल, पर्स व चप्पल आढळल्याने पोलिसांचाही गोंधळ उडाला होता. पोलिसांनी अपेक्षा बेपत्ता झाल्याची नोंद करून तातडीने शोधमोहीम सुरू केली. गोवळकोट परिसरात वाशिष्ठी नदीपात्रात शोधमोहीम सुरू असतानाच मजरेकाशीच्या किनाऱ्यावर अपेक्षाचा मृतदेह आढळला. ही माहिती पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना दिली. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. पोलीस आता अपेक्षासोबत नेमकं काय घडलं असावं याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून अपेक्षाच्या घरातील लोकांचीही चौकशी केली जात आहे.

या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित – अपेक्षासोबत काही घातपात झाला की तिने आत्महत्या केली यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अपेक्षाला शेवटचं कोणी पाहिलं होतं? ती कोणाच्या दबावाखाली घर सोडून गेली होती का? तिचं शेवटचं बोलणं कोणाशी आणि काय झालं होतं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर अनुत्तरित असून पोलिसांकडून अपेक्षाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular