29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraबूस्टर डोसबद्दल आरोग्य मंत्रालयाचा ठोस निर्णय

बूस्टर डोसबद्दल आरोग्य मंत्रालयाचा ठोस निर्णय

हेल्थ केअर आणि फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरीकाना बूस्टर  डोस देण्याचा निर्णयाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २५ डिसेंबर रोजी केली

येत्या ३ जानेवारीपासून १५  ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. तर १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर  डोस दिला जाणार आहे. सर्वच ज्येष्ठ नागरिकांना डोस दिला जाणार नसून, त्यांच्यातील केवल कोमॉर्बिड म्हणजे ज्यांना गंभीर आजार आहे अशा  नागरिकांनाच तिसरा डोस दिला जाणार आहे.

बूस्टर डोसबद्दल सुद्धा आरोग्य यंत्रणा चर्चा मसलत करताना दिसून येत होती. त्यावर ठोस निर्णय झाला असून, याआधी घेतलेल्या कंपनीचाच बूस्टर डोस दिला जाणार असून,  याबाबतीत कोणाच्याही आरोग्याच्या संदर्भात कोणतीही रिस्क घेतली जाणार नसल्याचे  आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेल्थ केअर आणि फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरीकाना बूस्टर  डोस देण्याचा निर्णयाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २५ डिसेंबर रोजी केली. मात्र,  त्यावेळी बूस्टर डोस  हा कॉकटेल प्रकारामध्ये असणार की,  आधीच घेतलेल्या कंपनीचा असणार आहे,  याविषयी सुरु असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम लागला आहे.

खबरदारी म्हणून असे केले जाणार नाही तर आधीचे दोन डोस ज्या कंपनीचे घेतले आहेत, त्याचाच तिसरा बूस्टर  डोस दिला जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट केले आहे. याचीही ऑनलाईन, ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामध्येही आधारकार्डच्या द्वारेच नोंदणी केली जाण्याची शक्‍यता असून,  आधीच्या दोन्ही प्रमाणपत्रात कोणत्या कंपनीचे डोस दिले आहेत हे तपासूनच मग बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील गंभीर आजारी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यासाठी गंभीर आजारी ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी   तसे आजाराची हिस्ट्री असलेले प्रमाणपत्र डॉक्‍टरांकडून आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular