कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, बाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घाट होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे संक्रमितांची संख्या देखील आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने अजूनही चिंता कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भारतासह अनेक देशांमध्ये, बलाढ्य राष्ट्र अमेरिका येथेसुद्धा कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर वाढत चालला आहे. यातच काही देशांमध्ये दोन डोस पूर्ण झाल्यावर तिसरा बुस्टर डोस देण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, जगभरात अन्यत्र कोठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
प्रथम आपल्याला जगातील गरीब देशातील लसीकरण पूर्ण करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे. कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच म्हणता येईल कि, सध्या बूस्टर डोसची गरजच नाही. त्यावर आणखी संशोधन करण्याची गरज असल्याचे डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकन सरकारने डेल्टा व्हेरिअंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, २० सप्टेंबरपासून देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अमेरिकन सरकारने डेल्टा व्हेरिअंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी श्रीमंत देशांमध्ये कोरोना लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोस देण्याबाबत म्हटलं आहे कि, सध्या जगामध्ये लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने, चिंतेचं कारण नाही आहे. फक्त लस योग्य संख्येत आणि योग्य ठिकाणी वेळेत पोहोचण्याची आवश्यकता आहे.