28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeSportsलवलिनानं महिला बॉक्सिंगमध्ये रचली हिस्ट्री

लवलिनानं महिला बॉक्सिंगमध्ये रचली हिस्ट्री

सध्या सर्वत्र चर्चा असलेल्या टोकियो ऑलिम्पिक क्वार्टर फायनल सामन्यामध्ये भारताच्या लवलीनानं चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेनला ४-१ अशा मोठ्या फरकानं पराभूत केल आहे. याआधीही लवलीनाने जर्मनीच्या अनुभवी नडीने एपेत्झला पराभूत केलेले होते. आता लवलीनानं आपलं पदक निश्चित करून आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सेमीफायनलमध्ये जरी ती पराभूत झाली तरी तिने कांस्य पदक स्वतच्या नावे करून घेतले आहे. लवलीना ही भारताकडून मेडल जिंकणारी ६९ किलोग्राम वजनी गटातील पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी असून, त्यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने खेळून जिंकावे लागणार आहेत.

भारतीय बॉक्सर लवलिनानं महिला बॉक्सिंगमध्ये हिस्ट्री बनवली आहे. सेमिफायनल सामन्यामध्ये भले तिला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, देशासाठी तिने कांस्य पदक नावे केल आहे. लवलीनानं दमदार कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. पुढे लवलीनाचा पराभव तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं केला. लवलीनानं या विजयासह इतिहास रचत भारताचे नाव रोशन केले असून, आणखी एका पदकावर नाव कोरून निश्चित केलं होतं. आजच्या सेमी फायनलमध्ये तिला सुवर्ण पदक मिळवण्याची संधी होती मात्र तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला असून, कांस्य पदावर समाधान मानावे लागले आहे.

लवलीनाची बायोग्राफी पहिली असतात, ती एका आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणारी असून हे यश मिळविण्यासाठी तिने मोठ्या संघर्षाना तोंड दिले आहे. भारताच्या ग्रामीण, दुर्गम भागामधून आलेल्या अन्य काही खेळाडूं सारखाच लवलीनाचा देखील जीवन संघर्ष आहे. प्रत्येक वेळेला अनेक आर्थिक संकाटाचा सामना करत लवलीनानं ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.लवलीनाने तिच्या कर्तुत्वावर खेळाडूचा मानाचा अर्जुन पुरस्कार देखील पटकावला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular