23.3 C
Ratnagiri
Friday, January 10, 2025

राजापुरात बिबट्याची दोन कॅमेऱ्यांना हुलकावणीच

गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये बिबट्याचा राजरोसपणे संचार...

जिल्ह्यातील अवैध कात कारखाने बंद करा

खैर तस्करी संबंधित कातनिर्मिती कारखान्यांवर न्यायालयाने कारवाईचा...

मत्स्योत्पादनात ८१ हजार टनांची झाली घट…

राज्यातील मत्स्योत्पादनात गेल्या २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४...
HomeRatnagiriजिल्ह्याला विकासाकडे नेतील असे उद्योग आणण्याचा विचार सुरू : खा. नारायण राणे

जिल्ह्याला विकासाकडे नेतील असे उद्योग आणण्याचा विचार सुरू : खा. नारायण राणे

रत्नागिरीतील अनेकजण ठाकरे सेनेतून भाजपच्या वाटेवर आहेत.

रत्नागिरी येथे मतदारसंघात रोजगार, पायाभूत सुविधा आणि येथील लोकांचं आर्थिक उत्पन्न वाढवणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात’ आलेले आहे. कोणत्या भागात कोणते उद्योग आणा, ते उद्योग कोणत्या भागात चालतील यावर विचार सुरू आहे. करण्यात आला आहे. त्यासाठी येथे दोन-तीन भागात विभागणी करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी साधनसामग्री जेथे उपलब्ध होईल तेथे उद्योग नेणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. रत्नागिरीत भाजपाच्या संघटन पर्व आढावा बैठकीसाठी खासदार नारायण राणे हे गुरूवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी कोकण रेल्वे महामंडळ आर्थिक संकटात आले असल्याचे म ाजी केंद्रीयमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. या रेल्वेकडे कर्मचाऱ्यांचे पगार दयायला पैसे नाहीत. प्रवाशांसाठी सुख-सुविधा देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ही रेल्वे मध्य रेल्वेकडे समायोजन केल्यास कोकण रेल्वे जलदगतीने विकास होईल असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.

कोकण रेल्वे ज्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यातून जाते, त्या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यानी त्या समायोजनासाठी परवानगी देणे गरजेचे असल्याचे खा. नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खा. नारायण राणे यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका केली. रत्नागिरीतील अनेकजण ठाकरे सेनेतून भाजपच्या वाटेवर आहेत. अनेकांनी प्रवेशदेखील केला आहे. मध्यंतरी येथे पूर आला त्या पुरात ही सेना वाहून गेली की काय अशा उपरोधिक स्वरात खा. राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा समाचार घेतला. आज भाजपला चांगले दिवस आले आहेत. राजकीय प्रवाह भाजपच्या दिशेने वाढतो आहे. त्यामुळे पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले पाहिजे. भाजपा केंद्र आणि राज्यात सत्तेवर आहे. लोकांना त्यामुळे विकास दिसतो आहे. या सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबवल्यां आहेत. त्यामुळे भाजपा लोकांना सुरक्षित पक्ष वाटत असल्याचे खा. नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. या पत्रकार परिषदेला भांजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अॅङ बाबा परुळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular