26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeInternationalब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा अचानक राजीनामा

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा अचानक राजीनामा

लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता.

४५ दिवसांच्या कार्यकाळानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानलिझ ट्रस यांनी गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यावेळीही त्यांचा मार्ग सोपा नसल्यामुळं त्यांना अनेक दिग्गजांशी सामना करावी लागणार आहे.

लिझ ट्रस यांच्या विरोधात लढलेले माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्यासाठी उत्सुक आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी सुनक यांच्याकडं सध्या १३/८ असा मतांचा फरक आहे. जर ते जिंकले तर सुनक हे ब्रिटनमध्ये सर्वोच्च पद भूषवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती असतील.

लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सनही मैदानात उतरू शकतात, अशीही बातमी आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांना हटवण्यात आलं असलं तरी ते पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत बाजी मारू शकतात. वृत्तानुसार, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जॉन्सन यांना मिळालेल्या जनादेशाचा अजूनही फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे.

ब्रिटनचे माजी संरक्षण सचिव पेनी मॉर्डंट यांचंही नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आलं आहे. या वर्षीच्या कंझर्व्हेटिव्ह निवडणुकीत मॉर्डंट यांनी ट्रस आणि सुनक यांच्यानंतर तिसरं स्थान पटकावलं आहे. त्यांब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट हेही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला क्वासी क्वार्टेंगची जागा घेतली. या महत्त्वाच्या पदावर असल्याने ते ब्रिटनच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही सामील होऊ शकतात, असं मानलं जात आहे. च्याकडं सर्वमान्य उमेदवार म्हणून पाहिलं जातं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular