21.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriस्कॉर्पिओला अपघात ! नवटाक पावशेरवाल्या पुढाऱ्याची 'भाई' गिरी

स्कॉर्पिओला अपघात ! नवटाक पावशेरवाल्या पुढाऱ्याची ‘भाई’ गिरी

गाडी भरधाव वेगात आली आणि अचानक झाडावर जाऊन धडकली.

रत्नागिरी शहरानजीक नाचणे रोडला जोडणाऱ्या विश्वनगर परिसरात गुरूवारी रात्री ८.३० वा. च्या सुम ारास एका स्कॉर्पिओ गाडीला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी झाडावर जाऊन आदळली. एका दुचाकीला देखील तिने ठोकरल्याची चर्चा अपघातानंतर परिसरात सुरू होती. दरम्यान या अपघाताचे तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आपल्या म ोबाईलमध्ये फोटो काढले तर काहींनी व्हिडिओ देखील शूट केले होते. मात्र तेथे अचानक आलेल्या एका ‘नवटाक पावशेर ‘वाल्या पुढाऱ्याने दादागिरी करत हे फोटो आणि व्हिडिओ संबंधितांच्या हातातून मोबाईल खेचून घेत डिलीट केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान या अपघाताबाबत पोलीस स्थानकात चौकशी केली असता अशा प्रकारचा अपघात झाल्याची कोणतीही नोंद नसल्याचे पोलीसांनी पत्रकारांना सांगितले.

त्यामुळे या ‘नवटाक पावशेर’वाल्या पुढाऱ्याची पौंच तिथपर्यंत असावी, अशीदेखील चर्चा सुरू आहे. अधिक वृत्त असे की, विश्वनगर येथे बुधवारी रात्री ८.३० वा. च्या सुमारास एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगात आली आणि अचानक झाडावर जाऊन धडकली. एका दुचाकीला देखील तिने ठोकरल्याचे बोलले जाते. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे कळते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मोबाईलमध्ये फोटो कैद – हा अपघात झाल्याचे वृत्त. काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचे फोटो काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅम ऱ्यात कैद केले होते. काहींनी त्याचा व्हिडिओ शूट केला होता. कसे कोणास ठाऊक परंतु एका पुढाऱ्याला हे कळले आणि त्याने संबंधित नागरिकांच्या हातातून मोबाईल खेचून घेत दादागिरी करत हे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. हा पुढारी कोण? याची चर्चा सोशल मिडियावर शुक्रवारी चांगलीच रंगली होती. ‘नवटाक पावशेरवाला’ हा पुढारी होता आणि त्यानेच भाईगिरी करत फोटो, व्हिडिओ डिलीट केले, असे बोलले जाते. या अपघाताचा आणि त्या पुढाऱ्याचा संबंध काय? याचीही चर्चा सुरू होती. हा अपघात लपवण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता? याचीही चर्चा रंगली आहे. एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून त्याने हे केले, अशीही चर्चा सुरू आहे.

क्रेन बोलावली – दरम्यान अपघातग्रस्त स्कॉर्पिओ हलविण्यासाठी क्रेनला बोलावण्यात आले. मात्र या अपघाताविषयी पोलीस स्थानकात कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या ‘नवटाक पावशेर’वाल्या पुढाऱ्याची मजल तिथपर्यंत पोहोचली असावी, असे बोलले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular