23 C
Ratnagiri
Wednesday, February 11, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriबांधकाम कामगारांच्या मुलांची शासनाकडून सुरु असलेली परवड थांबवावी - महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा...

बांधकाम कामगारांच्या मुलांची शासनाकडून सुरु असलेली परवड थांबवावी – महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेची मागणी

बांधकाम कामगारांसाठी विविध शैक्षणिक कल्याणकारी योजना आहेत. त्यापैकी शैक्षणिक कल्याण योजना एज५ मधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांचे व पत्नीचे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी विविध वैद्यकीय अभ्यासक्रम धारकांना प्रतिवर्षी एक लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते.या अभ्यासक्रमात  बी.फार्मसी, बी.एस.सी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, यासह अन्य प्रमुख अभ्यासक्रमांचा अंतर्भाव आहे.

यामध्ये नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे. त्यामुळे काही नोंदणीकृत कामगार आपली नोंदणी दुसऱ्या वेळी ऑनलाइन नूतनीकरण करून या लाभासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करीत असतांना विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणे पॅरामेडिकल वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता असणारे पर्याय बंद केल्याचे दिसून येत आहे. परंतु, अनेकांनी या योजनेला अनुसरून शासनाच्या भरवशावर परिस्थिती नसतानांही मोठ्या प्रमाणात वैद्यकीय प्रवेश घेतले आहेत. परंतु शासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे परिपत्रक अथवा शासन निर्णय घोषित न करता ही योजना अचानक बंद करण्यात आली आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केलेले बांधकाम कामगारांच्या मुलांचे  पाठ्यवेतन पुनश्च सुरु करुन बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नाला ५१ हजार आर्थिक सहाय्य करण्यात यावे, यासह शहरातील नोंदणीकृत कामगारांना घर बांधण्यासाठी भूखंडासह आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेच्या वतीने ई-मेलच्या माध्यमातून कामगार मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

हा निर्णय एकतर्फी आणि अयोग्य असून त्यातून बांधकाम कामगारांच्या मुलांची शासनाकडून सुरु असलेली परवड थांबवावी, असे मत महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष बाबा ढोल्ये उपाध्यक्ष डॉ गौरव ढोल्ये, सरचिटणीस संजय पुनसकर, निलेश आखाडे, राजाराम गावडे, रघुनंदन भडेकर, मनोहर गुरव आदींनी केली आहे. यासाठी वैद्यकीय तसेच अन्य शिक्षणासाठी विधायक दृष्टिकोनातून सुरू असलेले शैक्षणिक कल्याण योजना एज-५ चे पाठ्यवेतन तत्काळ सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत लवकरच उपायुक्त कामगार आयुक्तांना भेटण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular