22.8 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriसंगमेश्वरमध्ये चोरट्यांचा उच्छाद सुरूच दुकानांपाठोपाठ आता बंगला फोडला

संगमेश्वरमध्ये चोरट्यांचा उच्छाद सुरूच दुकानांपाठोपाठ आता बंगला फोडला

कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला. 

संगमेश्वर तालुक्यातील साडवली सप्तलिंगीनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पाच बंद घरे फोडल्याची घटना ताजी असतानाच आता चोरट्यांनी तालुक्यातील करंजारी येथील मधूसुदन शिवराम भुर्के यांचा बंद बंगला फोडून तब्बल १२ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्ताने अनेकजण बाहेरगावी किंवा दिवाळीत आपल्या घरी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली असून काही दिवसांपुर्वी साडवली सप्तलिंगीनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पाच बंद घरे फोडल्याची घटना घडली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर आता चोरट्यांनी करंजारी येथील बंद बंगला फोडून तब्बल १२ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. येथील सेवानिवृत्त शिक्षक मधुसूदन भुर्के हे दिवाळीनिमित्ताने दि. .२४ ऑक्टोबर रोजी घर बंद करून मुंबईला गेले होते तर त्यांची पत्नी कोल्हापूर येथे माहेरी गेली होती. त्यांचे घर (बंगला) बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.

मधुसूदन भुर्के हे मंगळवारी मुंबईहून आपल्या करंजारी येथील घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश करताच त्यांना घरात काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. त्यांनी कपाट उघडून पाहिले असता कपाटातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच याची माहिती देवरूख पोलीस ठाण्याअंतर्गत साखरपा पोलीस दुरक्षेत्रात दिली. चोरीचे गांभीर्य ओळखून लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पो. हे. काँ. नितीन जाधव, हे. काँ. सचिन पवार, हे. काँ. सचिन कामेरकर आदि. उपस्थित होते. तर रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलीसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे. घटनेचा तपास लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, साडवलीनंतर आता करंजारीत घरफोडीची घटना घडल्याने देवरूख पोलीसांसमोर चोरीचा छडा लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular