25.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriरत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी...

रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी…

एका रात्रीत झालेल्या या ३ घरफोड्यांमध्ये कोणती मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही.

शहरातील घरफोडीचे सत्र सुरुच असून सलग तिसऱ्या रात्री म्हणजेच शुक्रवारी पहाटे ३ वा. सुमारास शहरातील अभ्युदयनगर परिसरातील नुतननगर येथील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ५० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल लांबवला. याबाबत पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, सायली झगडे (५०, रा. नुतननगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी भल्या पहाटे अज्ञाताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच तोडून त्याद्वारे घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील सोन्याचे कानांतले व रोख ५० हजार रुपये असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल लांबवला. शुक्रवारी सकाळी सायली झगडे या वरील मजल्यावरुन खालील मजल्यावर आल्या असता त्यांना तेथील बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

याप्रकरणी अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी करत आहेत. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील छत्रपतीनगर येथील बंद बंगल्याची रेकी करून चोरट्यांनी तो फोडला. यामध्ये सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रोकड़ चोरट्यांनी लांबवली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी शहराजवळील साईनगर येथे ३ बंद घरे फोडली. एका रात्रीत झालेल्या या ३ घरफोड्यांमध्ये कोणती मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे कोणी तक्रार केलेली नव्हती. शुक्रवारी तिसरी चोरी झाली आहे. दरम्यान, शहर पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत असून शहरात झालेल्या घरफोड्यां शोध घेण्यासाठी साळवीस्टॉप, नाचणे, मारुती मंदिर येथील सीसीटिव्हींचे फूटेज तपासले जात आहेत. त्याआधारे आपण लवकरच संशयितांच्या मुसक्या आवळू असा विश्वास शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular