27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...
HomeLifestyleताकाचे अभूतपूर्व फायदे

ताकाचे अभूतपूर्व फायदे

ताक शरीरातील उष्णता त्वरित कमी करून, शरीराला आतून थंड करते.

सध्या उन्हाळा सुरु असल्याने, अनेक आजार डोके वर काढतात . जास्त करून पित्त, डोकेदुखी, दाढदुखी, चक्कर येणे, वारंवार घाम येण्याने होणारे डीहायड्रेशन त्यामुळे जाणवणारा थकवा. बाहेर असणाऱ्या अतिशय उष्ण तापमानामुळे उन्हात बाहेर पडणे देखील कठीण वाटू लागले आहे. अशा काळात जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा काहीतरी थंड पिण्यासाठी विकत घेतोच. अशा वेळी लोक सहसा शीत पेय किंवा सोडायुक्त काहीतरी पेय विकत घेतात. मात्र, ही पेय आपल्या शरीरासाठी अतिशय विपरीत परिणाम करतात.

अशावेळी शीतपेयांचे सेवन करण्या ऐवजी ताक किंवा लिंबू सरबत पिणे हा उत्तम पर्याय नक्कीच ठरू शकतो. ताकामध्ये शरीर थंड ठेवण्यासोबतच अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर टाकून शरीराची रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर सुदृढ होते. ताकाच्या सेवनाने शरीरातील चरबी देखील कमी होते. इतकेच नव्हे तर, ताक केस आणि त्वचेसाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे.

ताकामध्ये व्हिटामिन बी१२, कॅल्शियम, पोटेशियम आणि फॉस्फरससारखे घटक उपलब्ध असतात, जे शरीरासाठी फारच उपयुक्त आहेत. ताक शरीरातील उष्णता त्वरित कमी करून, शरीराला आतून थंड करते. सोबतच ताकाच्या सेवनाने चरबी आणि अतिरिक्त लठ्ठपणा कमी होतो. उन्हं लागल्याने अनेकदा वारंवार लघवीचा त्रास होत असेल, तर ताकात मीठ टाकून प्यावे. यामुळे त्रास कमी होतो. अनेकांना तोंड येण्याची समस्या वारंवार येत असते. तोंडात, घशामध्ये फोडी येत असल्यास ताकाने गुळण्या केल्याने त्वरीत आराम पडतो. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखीत देखील आराम मिळतो. पित्तावर तर ताक एकदम रामबाण उपाय आहे. त्यावेळी ताकामध्ये साखर आणि काळी मिरी मिसळून प्यावे. अनेक जुन्या आजारांवर ताक उपयुक्त आहे.

RELATED ARTICLES

Most Popular