27.9 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeMaharashtraरूबी हॉल क्लिनिक पुणे किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरण, १५ जणांना अटक

रूबी हॉल क्लिनिक पुणे किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरण, १५ जणांना अटक

पैशांच्या मोहापाई वैद्यकीय क्षेत्रातील देव सुद्धा ज्यांना आपण डॉक्टर म्हणतो ते देखील अशा घटनांमध्ये सामील असतात हे दुर्दैव.

अनेक लहान मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर रित्या अवयव विक्री करण्यात आल्याच्या घटना आपण वारंवार ऐकतो. अशीच एक घटना पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये घडली आहे. पैशांच्या मोहापाई वैद्यकीय क्षेत्रातील देव सुद्धा ज्यांना आपण डॉक्टर म्हणतो ते देखील अशा घटनांमध्ये सामील असतात हे दुर्दैव.

पुण्यातील नामांकित रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणूक आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ लाख रुपयांच्या आमिषाने एका महिलेचे किडनी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्चमध्ये उघड झाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य आरोग्य विभागाने रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.

आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, उपसंचालक रेबेका जॉन, कायदेशीर सल्लागारमंजूषा कुलकर्णी सुरेखा जोशी, अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, यांच्यासह डॉ. अभय सद्रे, डॉ. मुफ्त भाटी, डॉ. हिमेश गांधी,  सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने यांच़्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत

सारिका सुतार या महिलेला अमित साळुंखे या रुग्णाने पंधरा लाख रुपयांचे आमिष दाखवून रूबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी प्रत्यारोपण केले. साळुंखे याने सादर केलेली सर्व कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. परंतु, प्रत्यारोपण करून देखील १५ लाख रुपये मिळाले नाही म्हणून सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हा सर्व किडनी तस्करीचा प्रकार उघड झाला. सोबतच पैशांसाठी किडनी विकलेल्या महिलेलाही आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular